पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

औंध जकात नाक्याच्या जागी पीएमपीचा डेपो- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

पुणे : औंध येथील महापालिकेच्या जकात नाक्याच्या जागेवर ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’चा (पीएमपीएमएल) डेपो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बसेस आणि कचरा यापासून हा परिसर मोकळा झाल्यानंतर, त्या ठिकाणी एक नवीन सुस्थितीतील बस डेपो आणि पार्किंग सुविधा स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

राज्य सरकारने काही वर्षापूर्वी जकात कर रद्द केला. त्यानंतर शहराच्या सीमेवर असलेल्या जकात नाक्यांच्या मोठमोठ्या जागा ओस पडल्या. या ओस पडलेल्या जागांवर पीएमपीचे पार्किंग व्हावे किंवा सरकारी कार्यालये उभी करावी आणि त्याचा वापर करावा, असे पर्याय पुढे आले. पण, त्याबाबतचा ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जकात नाक्यांच्या जागा मोकळ्या राहिल्या.

औंध येथे तर जकात नाक्याच्या दिवाळखोरीत निघालेल्या ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनी आपल्या गाड्या ओस पडलेल्या जकात नाक्याच्या जागेवर आणून लावल्या, याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या. सुमारे ७० बस या कचरा आणि ढिगाऱ्यात पडून आहेत. या बसेस प्रत्यक्षात पीएमपीएलच्या दिवाळखोर ठेकेदारांच्या आहेत, यासंदर्भात त्यांनी पीएमपीएमएलच्या उच्च अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. भागात रहिवासी नागरिकांना बंद पडलेल्या वा त्रासदायक बसेस या जागेवरून हटविण्याचे आश्वासन यावेळी या बसेसच्या मालकांनी दिले आहे.

औंध परिसरात पोलीस गस्त वाढवावी : शिरोळे
एका टोळीने केलेल्या हल्ल्याची घटना लक्षात घेऊन, औध परिसरात पोलीस गस्त वाढवावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. संबंधित घटनेची गांभीयांन दखल घेऊन चतुः श्रृंगी पोलीस निरीक्षकांसमवेत आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!