पिंपरद ची चिमुकली सई भालचंद्र भगत ची अथेलेटिक्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद
या कामगिरीबद्दल झाला भव्य नागरी सत्कार
वयाच्या साडे सहा वर्षांपासून धावणारी सई ही 5 किलोमिटर न थांबता 34 मिनिटांमध्ये धावणारी सर्वात लहान अथेलेटिक्स म्हणून अथेलेटिक्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे तिची माननीय प्रशिक्षक व मार्गदर्शक श्री अजित कर्णे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दखल घेतली आहे.
नाशिकमध्ये सहाव्या राष्ट्रीय SDPF क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या .या स्पर्धेमध्ये 800 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. जिल्हा परिषद केंद्रशाळेतील सई भालचंद्र भगत (वय फक्त 8 वर्ष) या खेळाडूचा 200 मीटर (ऍथलेटिक्स) प्रकारामध्ये 14 वर्ष वयोगटात तृतीय क्रमांक. शिवराज सतीश भगत या खेळाडूला कबड्डी मध्ये फर्स्ट प्लेस तसेच 800 मीटर (ऍथलेटिक्स)प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळवला.
ही क्रीडा स्पर्धा एका 8 वर्षांच्या विद्यार्थीनीमुळे चर्चेचा विषय ठरली जिल्हा परिषद केंद्रशाळा पिंपरद तालुका;फलटण येथून आलेली सई भगत हिने 200 मीटर अथेलेटिक्स प्रकारात अतिशय उत्तम कामगिरी बजावली. या सई च्या उत्तुंग यशामुळे तिचे पिंपरद चे ग्रामस्थ व जिल्हा परिषद केंद्रशाळा पिंपरद यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
याच बरोबर मौजे बरड तालुका फलटण गावातील सर्व विजयी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कारच्या प्रसंगी सरपंच मा. स्वाती भगत मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा. डॉ.राहुल भगत साहेब,ग्रामपंचायत पिंपरद चे विद्यमान सद्यस्य व शाळा व्यवस्थापन समिती चे शिक्षण तज्ञ मा. हनुमंत शिंदे साहेब,ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य प्रताप शिंदे साहेब, माजी सरपंच भूषण शिंदे साहेब,माजी सरपंच तुकाराम ढमाळ साहेब,माजी उपसरपंच जीवन भगत साहेब,ग्रामपंचायत माजी सदस्य राजाराम भगत साहेब,शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष ज्ञानेश्वर यादव साहेब, पोलिस पाटील सुनील बोराटे साहेब, ग्रामसेवक बळीप सर,पिंपरद केंद्राच्या केंद्रप्रमुख माने मॅडम,मुख्याध्यापक शिंदे मॅडम,काकडे मॅडम,काळे सर,विभूते मॅडम, माने मॅडम ,वसावे मॅडम, मदने सर उपस्थित होते.
याचबरोबर गावातील तरुणांचे मंडळ छावा ग्रुप ,शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.या प्रसंगी प्रत्येक जण सई चे कौतुक करताना दिसले.