क्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा,बरड शाळेतील मुलांचे यश

नाशिकमध्ये सहाव्या राष्ट्रीय SDPF क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये ८०० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. राष्ट्रीय 6Th Sdpf फेडरेशन इंडिया यांच्या अंतर्गत नाशिक येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये बरड शाळेच्या विद्यार्थ्यांना ॲथलटिक्स स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

अनुराग गावडे १०० मिटर गोल्ड मेडल, निखील पवार ४००मिटर गोल्ड मेडल, ध्रुव लोंढे ६००मिटर गोल्ड मेडल, रोहित राऊत गोळा फेक गोल्ड मेडल, अथर्व पडळकर १००मिटर सिल्व्हर मेडल मिळवून यश संपादन केले आहे.

या खेळाडूंनी पालकांचे, क्रीडा शिक्षकांचे तसेच शाळेचे व बरड गावाचे नाव मोठे केले.या स्पर्धेत क्रीडामार्गदर्शक म्हणून अजित कर्णे सरांनी मेहनत घेतली. याचबरोबर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बरडचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, खेळाडू विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांचे सहकार्य लाभले.

वरील सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षक कर्णे सर यांचे हार्दिक अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!