पुणेमहाराष्ट्रविशेषसामाजिक

श्री श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव पुण्यात रविवारी (दि. ७ जुलै)

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन

पुणे : ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा मोठया उत्साहात साजरी होते. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे रविवार, दिनांक ७ जुलै रोजी दुपारी १ वाजता टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे आणि उपाध्यक्ष संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला रथयात्रा समन्वयक अनंतगोप प्रभू आणि संपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस उपस्थित होते.भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची दया जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली.

Oplus_131072

रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या देवतांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते.महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, इस्कॉन संस्थेचे संन्यासी प.पू. कृष्णचंद्र महाराज, प्रबोधनंद स्वामी, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी आणि इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती झाल्यानंतर १ वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल. स.प.महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स.प.महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे.

ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठया उत्साहात होणार असून यामध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट केली जाणार आहे. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविक ओढणार आहेत. समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल. जवळपास २० हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर होणार आहे.

रथयात्रा मार्गावर १ लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात येणार आहेत.रथयात्रेमध्ये २० हजार भक्त सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारंपरिक वाद्याच्या गजरात हरे कृष्ण महामंत्राच्या घोषात रथयात्रा मार्गस्थ होणार आहे. रथयात्रा ही विश्व शांती आणि भक्तीचा समन्वय आहे.

जगाचे स्वामी जगन्नाथ हे मंदिरातून भक्तांना दर्शन देण्यासाठी रस्त्यावर येतात. सर्व नागरिकांनी भगवंतांच्या दिव्य रथयात्रेत सहभागी होऊन त्यांची कृपा प्राप्त करावी, असे आवाहन इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांनी केले आहे. इस्कॉन संस्थेचे पुण्यात कात्रज कोंढवा रस्ता, कँप आणि निगडी येथे मंदिरे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!