पुणे बिजनेस क्लब’चा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. उल्लेखनीय कामगिरीसाठी विविध क्षेत्रातील महिला उद्योजिकांना क्लब तर्फे सन्मानित केले गेले. यंदा ‘पुणे अचीवर्स डायमंड अवॉर्ड’, पुणे अचीवर्स प्लॅटिनम अवॉर्ड व पीबीसी बिझनेस प्राइड अवॉर्ड अशा श्रेणीमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले. दरवर्षी क्लब मध्ये महिला उद्योजिका एकमेकींमध्ये लाखोंची उलाढाल करतात. यामध्ये सर्वात जास्त सहयोग असलेल्या आणि क्लबचा पाया मजबूत करण्यासाठी कारणीभूत असलेल्या अल्मास कुची आणि डॉ. रेणुका गव्हाळे यंदा ‘पिलर ऑफ पीबीसी अवॉर्ड’ च्या मानकरी ठरल्या.
‘आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स ऑफ द इयर’ शिल्पा वखारकर यांना मिळाले. सदर पुरस्कार सिनेअभिनेत्री स्मिता शेवाळे, नृत्यांगना नुपूर दैठणकर, मॉडेल स्मृती गवळी आणि क्लबच्या संचालिका, संस्थापिका सपना काकडे यांच्या हस्ते देण्यात आले. यशस्वीपणे व्यवसाय सांभाळून आपली नाती सुद्धा तितकीच मजबूतपणे सांभाळणाऱ्या उद्योजिकांना विशेष पुरस्कार देण्यात आले. यामध्ये यामिनी दाहोत्रे आणि राजश्री दाहोत्रे यांना आदर्श जाऊ बाई हा पुरस्कार मिळाला. मनाली दीक्षित, काजल जाधव दीक्षित आणि शिल्पा शिंदे- दीपा शिंदे यांना ‘इन्स्पिरेशनल सिस्टर्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली दीक्षित यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान दिग्पाल लांजेकर यांनी लेखन व दिग्दर्शित केलेला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या समाज प्रबोधन करणाऱ्या चित्रपटाविषयी विशेष प्रमोशन करण्यात आले. अन्वी काकडे हिने संत मुक्ताईच्या वेशामध्ये पसायदान सादर केले तर केक आर्टिस्ट नमिता छत्रे यांनी केक बनवला होता. संत मुक्ताई व ज्ञानेश्वर माऊली यांचा आदर्श व प्रेरणा घेऊन ‘मुक्ताई पुरस्कार’ या विशेष पुरस्कारासाने क्लब मेंबर ‘खुशी पारीख’ यांना सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या पुरस्काराचे मानकरी…
दिपाली नकार, स्मिता बेलसारे, डॉ. दीप्ती वाघमारे, अल्मास कुची, पूनम भिक्षावतीमठ, अश्विनी जाधव, सोनल गंववाल, सविता पाटील, निकिता वोरा, डॉ. रेणुका गव्हाळे, नीलामिबिंका बसवराज, डॉ. स्नेहा शाह, ज्जाहरा फतेहपुरवला, शिल्पा शिंदे, दीपा शिंदे, हिरल देसाई, धनश्री जलनपुरे, कांचन सारडा,श्वेता सोनार, मृणाल खंडागळे, बोस्की जैन, वर्षा तदवडकर, दीपिका जैन, तरंनुम मुळे, खुशी पारीख, अर्पिता वैद्य, हेमांगी मेहता शाह, मानली दिक्षित, नमिता छत्रे, राजश्री धोत्रे, यामिनी धोत्रे, श्वेता साळुंखे, सुदीप चौधरी, स्वाती माहेश्वरी, पूर्वी श्रॉफ, मिरल शहा, स्मिता पोटे, काजल रांजण, निशी मुजुमदार, भारती शिर्के, मिनल होते, धनश्री बाबेल, रूपाली चौधरी मनाली गाडगीळ जयश्री थोरात रामेश्वरी विश्वकर्मा काजल दीक्षित तबसम शेख, प्रांजल कोटेच्या, पूर्वा जोशी, प्रांजल नहाता, तृप्ती रक्त, अमृता जलित सोनाली सिन्हा, कल्याणी देशमुख, हर्षदा वाणी, वृषाली वांजळे, सोनिका रघुवंशी, दीपा माळी, सीमा राय, चौधरी, स्मिता साठे, निकिता बडवे, रेश्मा जैन, योगिनी बगडे, रेश्मा भमबरे, श्वेता मंत्री, अर्चना मसुरेकर, विनू मावस, अमोल ढवळे व मीडिया वर्ल्ड चे सुमित जैन यांचा समावेश होता.