पर्यावरणपूरक साधनांनी विद्यार्थ्यांनी साकारल्या ५०० विविधरंगी पालख्या
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् च्या वतीने पालख्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : विविधरंगी कागद, पुठ्ठे, कागदाची फुले आणि नैसर्गिक फुलांचा वापर करुन पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक पालख्या साकारल्या. आषाढी एकादशीला पालखी खांद्यावर घेऊन विठू नामाचा गजर करण्यासोबतच प्रत्येकाने स्वत:च्या हाताने पालखी साकरण्याचा आगळावेगळा अनुभव घेतला.
न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या वतीने तब्बल ५०० हून अधिक पालख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या ५०० पालख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आणि उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी प्रदर्शनाला भेट दिली.सुरेखा जाधवर म्हणाल्या, संस्थेतर्फे दरवर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत: पालखी तयार करुन ती सोहळ्यामध्ये आणावी, ही संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार मागील एका आठवडयात विद्यार्थ्यांनी या पालख्या तयार केल्या आहेत.
मोठया पालख्यांपासून ते अगदी लहान पालख्यांपर्यंत ५०० हून अधिक पालख्या मुलांनी साकारल्या आहेत.