स्गरएनर्जी एनर्जी तर्फे भवानी पेठेतील विंग फाउंडेशन द्वारा संचालित सेवा क्लीनिक येथे नवीन पॅथॉलॉजी लॅबोरेटरी स्थापन करण्याची घोषणा केली. याचा उद्देश भवानी पेठ परिसरातील गोरगरीब जनतेस उच्चतम वैद्यकीय सेवा पुरवणे हा होय. आपण समाजाचे देणे लागतो आणि समाजावर अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याच्या स्गरएनर्जी च्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, हा उपक्रम गरजवंतांना आवश्यक आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी आहे.
पॅथॉलॉजी लॅबसाठी देण्यात आलेला निधी सेवा क्लिनिकला त्याच्या सुविधा वाढवण्यास सक्षम करेल, सामाजिक-आर्थिक स्थितीची पर्वा न करता सर्वांसाठी अत्यावश्यक आरोग्य विनासायास त्यांना पुरवता येतील. या ठिकाणी सेवा क्लीनिक सोबत भागीदारी करून ही अद्ययावत पॅथलॅब उभारणे म्हणजे आमच्या सामाजिक बांधिलकी चा एक भाग आहे.
सर्वाना उच्चतम आरोग्यसेवा मिळावी हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. आणि या भागीदारीमुळे भावनिपेठेतील लोकांना निश्चितच अद्ययावत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे.” असे प्रतिपादन आरिफ इक्बाल आगा, संचालक, स्गरएनर्जी India यांनी केले.
हे सहकार्य केवळ आर्थिक बांधिलकीचेच प्रतिनिधित्व करत नाही तर सामुदायिक कल्याण आणि सार्वजनिक आरोग्याला चालना देण्यासाठी स्गरएनर्जी च्या सतत जबाबदारीवरही भर देते.