पुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

प्रेरणा श्रावण सोहळा आणि प्रेरणा पुरस्कारचे वितरण बुधवारी (७ ऑगस्ट)

विनामूल्य असलेल्या या सोहळ्याचे पुणेकरांना निमंत्रण

पुणे: गुरूकुल एज्युकेशन फाउंडेशन’ आणि “प्रेरणा the motivation” आयोजित श्रावण सोहळा आणि प्रेरणा पुरस्कार २०२४ येत्या बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती, पुणे येथे सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आला असून यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष (पर्व) आहे. निखळ आनंद देणारा हा प्रेरणाचा श्रावण सोहळा सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश शुल्कावर खुला असून पुणेकरांना जाहीर निमंत्रण प्रेरणा the motivation”च्या संचालिका व कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका सौ शारदा दातीर पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिले. यावेळी गुरूकुल एज्युकेशन फाउंडेशन’चे विनोद दतीर, कृतिका डहाळे व सोहळ्याचे कमिटी सदस्य देखील उपस्थित होते.

यंदाच्या सोहळ्याविषयी बोलताना शारदा दातीर म्हणाल्या, निखळ आनंद देणारा हा श्रावण सोहळा नक्कीच आनंदासोबत नवीन उमेद देणार असतो. यंदाच्या वर्षी आदिवासी कातकरी महिलांच्या कलेचे विशेष सादरीकरण असणार आहे. सोबतच स्वतःला प्रेरित करण्यासाठी आय ॲम प्रेरणा फॅशन वाक, मंगळागौरीचे खेळ, लावणी, नृत्य, उपस्थितांसाठी भरघोस लकी ड्रॉ असतील; या मध्ये मोफत गोवा ट्रिप, मानाची पैठणी, सोन्याची नथ, आणि बरेच काही जिंकण्याची संधी असणार आहे. फ्री 360° व्हिडिओ बूथ, येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला स्नॅक्स बॉक्स आणि मिनरल वॉटरची देखील व्यवस्था आयोजकांनी करून दिली आहे.

प्रेरणादायी व्यक्तींचा पुरस्कारा मध्ये यंदा देण्यात येणारा प्रेरणा पुरस्कार कमलताई परदेशी, आकाश पवार, सौ. सपना काकडे, आकाश पवार, सौ. गौरी वनारसे, तृप्ती मांडेकर, कु. दुर्वा वाघ, राजश्री क्षीरसागर यांना जाहीर करण्यात आला असून सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!