आर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रव्यवसायीक

युनिकॉमर्स ईसोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ 6 ऑगस्ट 2024 रोजी खुला होणार

प्राईस बँड प्रत्येकी 1 रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी 102 ते 108 रुपये निश्चित करण्यात आला

राष्ट्रीय : युनिकॉमर्स ईसोल्युशन्स लिमिटेडच्या आयपीओसाठीची बोली/ऑफर 6 ऑगस्ट, 2024 रोजी खुली होणार आहे. या एकूण ऑफरमध्ये 25,608,512 पर्यंत इक्विटी समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात येतील आणि त्यापैकी 9,438,272 इक्विटी समभाग हे एसव्हेक्टर लिमिटेडकडून (आधीची स्नॅपडील लिमिटेड) (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर) आणि 16,170,240 इक्विटी समभाग एसबी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स पीटीई लिमिटेडकडून (समभाग विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार) विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात येत आहेत. या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहेत.

या ऑफरची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत – (1) समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून 25,608,512 इक्विटी समभागांची विक्री करणे आणि (2) इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्याचे लाभ मिळवणे. या ऑफरसाठी एनएसई हे नामनिर्देशित स्टॉक एक्स्चेंज आहे. हे इक्विटी समभाग दिनांक 30 जुलै 2024 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेकटसमार्फत प्रस्तुत केले जात आहेत, जे कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अँड हरियाणा यांच्याकडे नवी दिल्ली येथे आणि सेबी व स्टॉक एक्सचेंजेसमध्ये दाखल केले आहे. ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(2) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी 75% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.

यासाठी लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे.

पण जर म्युच्युअल फंडांची एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल तर वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी समभाग क्यूआयबीना प्रपोर्शनेट वाटपासाठी उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट ऑफरचा कमीत कमी 15% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल. नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 10% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे.

सर्व बिडर्स (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

बुक बिल्डिंग प्रक्रिया आणि ऑफर प्रक्रिया यांच्याशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी कृपया आरएचपीमधील पान क्रमांक 327 वरील “ऑफर प्रोसिजर” हा भाग वाचावा. या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलेल्या ज्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांची व्याख्या दिली गेलेली नाही त्यांचा अर्थ आरएचपीमध्ये देण्यात आल्याप्रमाणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!