पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

बौध्द कार्यकर्त्यांकडून न्यायालयाच्या निर्णयाची बैठकीद्वारे समीक्षा

तात्काळ जातीय जनगणना करावी : डॉ. सिध्दार्थ धेंडे

पुणे : अनुसूचित जातीच्या वर्गीकरणा संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची समीक्षा करण्यासाठी आज पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये काम करणाऱ्या बौद्ध कार्यकर्त्यांची बैठक ढोले पाटील रोड येथील नवयुग हॉलमध्ये पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या 565 पानांच्या निकालांचे यावेळी वाचन करण्यात आले.

निकाल पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अनुसूचित जातींसाठी क्रिमीलीयरचा धरलेला अट्टाहास हा अत्यंत धक्कादायक असून तो आरक्षण धोरणाची पायमल्ली करणार आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात व्यक्त होताना आरक्षणाच्या मूळ तत्वाला हरताळ फास्ती जाणार नाही याबाबत काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी वक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल पत्रानुसार राज्यांमध्ये व देशभरामध्ये जर अनुसूचित जातीमध्ये वर्गवारी करण्याची गरज वाटत असेल तर केंद्र सरकारने तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारने तात्काळ जातीय जनगणना करावी अशी आग्रही मागणी या बैठकीत मा. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांचे कडून करण्यात आली.

Oplus_0

रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे होते. याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर , डॉ. संजय दाभाडे , माजी नगरसेवक राहुल तुपेरे, सुवर्णा डंबाळे, विठ्ठल गायकवाड , युवराज बनसोडे , किरण सोनावणे , हनुमंत पपुल, किरण गायकवाड , अभिजीत गायकवाड , अनिता धिमधिमे , प्रभु सूनगर, आनंद कांबळे , प्रतिक डंबाळे , किशोर कांबळे , डॉ. सिध्दार्थ माने,अर्चना केदारी , स्वाती गायकवाड , आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत पुणे , सातारा , कोल्हापूर , सांगली , अहमदनगर इत्यादी भागातून प्रतिनिधी सहभागी झाले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे व्यापक समीक्षण करण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी पुणे येथे दुसऱ्या व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचे वकील तसेच निवृत्त न्यायाधीश हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती राहुल डंबाळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!