देश-विदेशपुणेमहाराष्ट्रविशेषव्यवसायीकशैक्षणिक

“प्रकाश-२०२४” तीन दिवसीय महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ

डॉ.विश्वनाथ कराड ‘विश्वशांती प्रकाश दीप पुरस्कार’ ने सन्मानीत तर प्रकाश बडजात्ये यांना जीवनगौरव प्रदान

Pune : इंडियन सोसायटी ऑफ लाइटिंग इंजिनिअर्स (ISLE) पुणे लोकल सेंटर, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, WeSpark आणि महा मेट्रो यांच्या सहकार्याने, प्रकाश-२०२४ हा तीन दिवसांचा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ आज १९ सप्टेंबर रोजी करण्यात आला. हा कार्यक्रम १९ ते २१ सप्टेंबर २०२४ दरम्यान MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे होणार असून, ज्याचा उद्देश प्रकाशाच्या माध्यमातून शाश्वत विकास, तंत्रज्ञानातील नावीन्य आणि सामाजिक कल्याण यांना नवीन दिशा देणे आहे.

प्रकाश हे आपले शहरी जीवनमान आकारण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे आणि ते आपले नागरिकजीवन कसे प्रभावित करते, यावर प्रकाश-२०२४ कार्यक्रमात भर दिला जाणार आहे. नवीनतम प्रकाश तंत्रज्ञान शहरांच्या अधोसंरचनेला कसे परिवर्तीत करू शकते आणि नागरिकांच्या सहभागातून ऊर्जा कार्यक्षम आणि सुरक्षित सार्वजनिक क्षेत्रे कशी निर्माण केली जाऊ शकतात, यावर सखोल चर्चा होईल. महा मेट्रो यांच्या सहकार्याने आयोजिलेल्या मेट्रो संवाद या सत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा आणि तरुण व्यावसायिकांचा सहभाग प्रोत्साहित केला जाईल. या संवादाद्वारे स्मार्ट सिटीज आणि त्यामध्ये प्रकाशाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा होईल. असे प्रास्ताविक व स्वागत भाषणात वीरेंद्र बोराडे यांनी नमूद केले.

देश भरातून आलेल्या विविध कंपन्यांचे स्टॉलचे प्रदर्शन देखील आयोजकांनी सदर केले असून याला उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सदर कार्यक्रमा दरम्यान इंडियन सोसायटी ऑफ लाइटिंग इंजिनिअर्स, पुणे लोकल सेंटर यांच्या वतीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘विश्वशांती प्रकाश दीप पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले. तर प्रकाश बडजात्ये यांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी व्हॉसकॉमचे सीएमडी वासुदेवन, पुणे मेट्रोचे संचालक विनोद अग्रवाल, अतुल गाडगीळ, जयंत इनामदार, हर्षा जोशी आणि विरेन्द्र बोराडे, अभिजीत साळुंखे याच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “जगाला योग्य प्रकाश देण्यासाठी शांती ही अत्यंत महत्वाची आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘सत् चित् आंनद’ या दोन गोष्टींनी सृष्टीवरील प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि सुखी राहु शकतो. वर्तमान काळात विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय महत्वाचा आहे. स्वामी विवेकानंद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारत विश्वगुरू होईल व ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल.”

व्हॉसकॉमचे सीएमडी वासुदेवन म्हणाले,”प्रकाश हे आपले शहरी जीवनमान आकारण्याचे महत्वपूर्ण साधन आहे. या मुळे नागरिक जीवन प्रभावित होते. नवीनतम प्रकाश तंत्रज्ञान शहरांच्या अधोसंरचनेला कसे परिवर्तीत करू शकतात हे महत्वाचे आहे. नागरिकांच्या सहभागातून ऊर्जा कार्यक्षम आणि सुरक्षित सार्वजनिक क्षेत्रे कशी निर्माण केली जाऊ शकतात यावर लक्ष देणे गरजेचे आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!