पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

दलित पँथरच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आबासाहेब शिंदे यांची नियुक्ती

पुणे : दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या हस्ते देण्यात आले, दलित पँथर संघटना वंचित बहुजन समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी कार्य करणारे संघटन म्हणून सर्वश्रुत आहे.

राज्यातील तसेच देशातील अनेक आंबेडकरी नेतृत्व या संघटनेने घडवली आहेत. यावेळी नडघम यांनी संघटनेची ध्येय धोरणं आणि संघटनात्मक कार्याची माहिती उपस्थितांना देऊन नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. तर येणाऱ्या काळात संघटना अधिक मजबूत करून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन आबासाहेब शिंदे यांनी दिले.

आबासाहेब शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून वंचित समाज घटकांना न्याय मिळावा या साठी राज्यभर विविध सामाजिक चळवळींच्या माध्यमातून कार्यरत आहेत. राज्यात त्यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे दलित पँथरचे संघटन अधिक मजबूत होईल अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला राज्यातील संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!