मानसिक त्रासाला कंटाळून आसावरी अक्षय दळवी या नवविवाहितेने संपवले जीवन
सोन्याचे कडे ऐवजी चैन देऊन माहेरच्यांनी केले होते मन राखण
Pune: पुण्यातील हिंजवडी सारख्या उच्चभ्रु भागात केवळ लग्नात नवरदेवाला सोन्याचा कंडा घातला नाही या कारणावरुन कुटुंबात होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.त्यातच घडलेली घटना संशयास्पद असल्याचे सांगत पुणे येथे पत्रकार परिषद घेत ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत पीडितेच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला तरी पोलिसांच्या तपासाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. याबाबत आसावरी यांच्या आई जयश्री पवार राहणार शिरवळ ता.खंडाळा यांनी तक्रार दिली असून आसावरी अक्षय दळवी (वय २३, रा. लिओनारा सोसयटी, गोदरेज, म्हाळुंगे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
त्यानुसार पोलिसांनी अक्षय अरविंद दळवी (वय २७, रा. भोसलेमळा, अयोध्यानगरी सोसायटी, सातारा), पुष्पा अरविंद दळवी (वय ४५) आणि पज्ञा राजेश शिर्के (वय ३४, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.याबाबत जयश्री पवार यांनी पुणे येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेत आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचताना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आसावरी हिचा अक्षय दळवी याच्याशी डिसेबर २०२३ मध्ये विवाह झाला.
लग्नावेळी नवरदेवाचे वडिलांनी मुलाच्या हातात सोन्याचा कंडा घालण्याची मागणी केली होती. परंतु परिस्थितीमुळे ते शक्य नसल्याचे सांगतानाच मुलाची सोन्याची चेन घालण्याची मागणी पूर्ण करण्यात आली.जावई अक्षय दळवी हे विप्रो पारी कंपनी शिरवळ येथे डिझाईन इंजिनिअर म्हणून कामाला असून मुलगी इंडसइंड बँकेत कॅशियर म्हणून कामाला होती . परंतु वेगवेगळी कारणे सांगत जावई अक्षय मुलीकडून तिचा अर्धा पगार काढून घेत तिची आर्थिक कोंडी करीत होता. लग्नानंतर मालदिवला फिरायला जायचे असे सांगून मुलीकडून अक्षयने ७५,००० रुपये तिच्या बचत गटातील खात्यातून घेतले होते .
नंतर दिल्लीला फिरायला जाण्यासाठी शिरवळ येथील बचत गटातून ७०,००० रु. कर्ज घेतले होते .लग्नानंतर काही दिवसातच लग्नात कमी दागिने घातले, तसेच इतर घरातील किरकोळ कारणावरुन आसावरी हिचा मानसिक, शारीरीक व आर्थिक छळ होऊ लागला.याबाबत मुलीने आम्हाला सांगितले होते परंतु आम्ही तिला समजावून सांगितले होते.सोबतच्या एफ आय आर मधील घटने प्रमाणे मुलगी आसावरी विश्वास पवार उर्फ आसावरी अक्षय दळवी रा. लियोनारा सोसायटी, सदनिका क. एफ ३०३, नांदे म्हाळूगेरोड म्हाळुंगे, पुणे हिला तिचे पती अक्षय अरविंद दळवी, सासू पुष्पा अरविंद दळवी दोघे रा. भोसले मळा, अयोध्यानगरी सोसायटी, सातारा मूळ गाव मु. पो. महाते खुर्द, ता. जावली तसेच नणंद प्रज्ञा राजेश शिर्के रा. नेरूळ, सावुड, नवी मुंबई यांनी आपसात संगणमत करून लग्नात कमी दागिने घातले, तसेच इतर घरातील किरकोळ कारणावरून तिचा मानसिक, शारिरीक व आर्थिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
या छळाला कंटाळून आसावरी हिने लिओनारा सोसायटीमधील घरात १७ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.तिचे धार्मिक कार्य पूर्ण झाल्यावर तिच्या आईने फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहे. दि.१७/८/२०२४ रोजी मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशनला दि. २/९/२०२४ रोजी सी. आर. नं. ९९८/२०२४ अन्वये तक्रार दिलेली आहे. पंरतू सदर कामी आज पर्यत कोण्याही आरोपीस अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप जयश्री पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
इतकेच नाही तर पोलीसांनी तक्रार मी सांगितले प्रमाणे घेतलेली नाही, कारण आम्ही गेलो तेव्हा माझे मुलीचे शव मला तिचे पाय जमीनीला टेकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले यावरून सदरील घटना ही आत्महत्या नसून पूर्व नियोजित उपरोक्त इसमानी माझे मुलीचा केलेला खुन आहे अशा माझा संशय आहे.पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने पत्रकार परिषद घेवून न्यायाची मागणी केल्याचे पीडितेच्या आईने सांगितले आहे.पुण्याचे डॅशिंग पोलीस आयुक्त अमितेश कुमार याप्रकरणी लक्ष घालणार का ?गृह खाते आपणच महिलांना तत्काळ न्याय मिळवून देण्याबाबत काढलेल्या परिपत्रकाला जागणार काय ? की एकविसाव्या शतकात सुध्दा हुंडाबळी महिलांचे आत्मे न्यायासाठी टाहो फोडणार हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.