पुणेमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयविशेष

महिला, युवतीनी मोठ्या उत्साहात लुटला दांडियाचा आनंद

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर तर्फे महाभोंडला आणि रास दांडिया

Pune: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर तर्फे दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नवरात्र महोत्सव निमित्त महाभोंडला आणि रास दांडियाचे गोगटे प्रशाला, नारायण पेठ या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला, युवतीनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

यनिमित्ताने लकी ड्रॉ मधून ५ विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सर्वोत्कृष्ठ नृत्य, सर्वोत्कृष्ठ ड्रेसिंग अश्या विजेत्यांना देखील आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. महिला वर्गासाठी मसाला दूध वाटप सुद्धा करण्यात आले. तसेच आकर्षक सेल्फी बूथ देखील ठेवण्यात आला होता.

यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, उपाध्यक्ष दत्ता सागरे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, करण मानकर, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विध्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, सरचिटणीस अर्चना चंदनशिवे, रुहिसबा सय्यद, अर्चना हनमगर,

सांस्कृतिक सेल अध्यक्ष विजय राम कदम, व्यापारी सेल अध्यक्ष वीरेंद्र किराड, गौरी जाधव,संगीता बराटे, शीतल मेदाने – येनपुरे, नरेश जाधव, राहुल तांबे, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष तेजल दुधाने, लावण्या शिंदे, डिम्पल इंगळे, गौरी पिंगळे, प्रीती डोंगरे,माधवी मोरे,श्रेया तांबे, पद्मिनी ओसवाल, विजया भोसले,सुनीता चव्हाण, पूनम पाटोळे, नम्रता बोंदर, सत्यम पासलकर, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!