आर्थिकगुन्हेगारीपुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

भूमी अभिलेख व महसूल खात्याच्या भ्रष्टाचार; दोषींवर कारवाई होईपर्यंत मागे हटणार नाही : पीडित शेतकरी राऊत यांचा निर्धार

भूमी अभिलेख व महसूल खात्याच्या भ्रष्टाचारावर केले प्रश्न उपस्थित

पुणे (लवळे / ता. मुळशी): जागा मालकाच्या मूळ जागेवर घर बांधलेले असताना ती जागा शेजारच्या गटात दाखवली. जमिनीची शासकीय मोजणी करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यानीच शेजारी जागा असणाऱ्यांसोबत संगनमत करून परस्पर खोटी मोजणी केली. घर शेजाऱ्याच्या जागेवर बांधले असल्याचं कागदोपत्री दाखवुन ते कागदपत्रे कोर्टातही सादर करत फसवणूक केली. त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार राउतवाडी लवळे येथील पीडित शेतकरी अरुण राऊत यांनी केला.

राऊत यांचे राउतवाडी लवळे, ता. मुळशी येथे गट नंबर 413 येथे दहा गुंठे जागा आहे. त्याला लागूनच गट नंबर 430 असून त्या गटात घर बांधल्याचे नकाशात दाखवत आहे. पण ही शुद्ध फसवणूक झाली आहे. याबाबत २००६ साली शासकीय मोजणी झाली, ती मोजणी भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी हेमंत निगडे यांनी केली. आणखी दोन वेळा झाली, पण ती चुकीची आहे. 2023 ची मोजनी प्रसाद तरटे आणि अंकुश जाधव यांनी केली.

तीपण नकाशतील सरळ लाईन त्या दोघांनी वाकडीतीकडी केली व माझ्या घरावर तीरकी लाईन ऊडवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.मी दोषींच्या कारवाईवरती ठाम आहे. सोमवार 12 मार्च 2024 पासुन या विषयाचा पाठपुरावा करतोय तरीही कुठल्याही प्रकारची हालचाल अद्यापपर्यंत झालेली नाही. माझ्यावर अन्याय या तीन दोषींमुळे झालाय. माझी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी बसवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करत आहे. मोजनी अधिकारी इतके बिनधास्त आणि मोकाट कुणाच्या आशिर्वादाने झाले आहेत याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहीजे, अन्यथा मी माझा जीव गेला तरी थांबणार नाही.

माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये, असा इशारा लवळे येथील पीडित शेतकरी राऊत यांनी दिला.सन २००६ च्या मोजीनीचे पेपर महसूल खात्याच्या कार्यालयात उपलब्ध नाहीत. मोजनीचे सर्व सरकारी व खाजगी पुरावे देऊन सुद्धा दुरुस्ती करण्यास टाळाटाळ केली जाते. दोषींना पाठीशी का घालता? टाळाटाळ का करता? आचारसंहितेचे कारण सांगू नका. चाळीस दिवस दिलेत पाटील मॅडम म्हणतात हद्दी दाखवल्या त्या त्यांना मान्य नाहीत म्हणतात. मग त्या हद्दी सरळ व नाकाशाप्रमाणे का नाहीत? माझ्या घरावरच आल्यावर लाईन तिरकी का गेली? गट नकाशा प्रमाणे लाईन सरळ का येत नाही? असे रोखठोक सवालही राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

वरिष्ठ अधिकारी जसे प्रांत, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पणे जमाबंदी आयुक्त या सर्वांना मार्च पासून दोनदा पत्र देऊन सुद्धा कोणत्या प्रकारची विचारपुस झाली नाही. हया प्रकारणात कुठल्या प्रकारचा दबाव आहे का याची चौकशी तात्काळ करावी. मी सोमवार 12 मार्च 2024 पासुन या विषयाचा पाठपुराव करतोय. तरीही कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही. सगळे पुरावे देऊन सर्व अधिकाऱ्यांना जागेवर आणून दाखवले आहे. जिल्हाअधिकारी, प्रांत, पोलिस आयुक्त,जमाबंदी आयुक्त या सर्वाना कळवून देखील कुठल्या प्रकाची चौकशी केली नाही. या भ्रष्टाचार्यांना मोकळे रान कशासाठी, असेही ते म्हणाले.मी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतोय की माझ्या सारख्या ज्या शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कडून अडचणी आल्या असतील त्या शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क करून उपोषनात सामील व्हावे.

भूमिअभिलेख मोजणी आधिकारी फक्त बिल्डर आणि उद्योगपतीचीच कामे करतात. सामान्य शेतकऱ्यांची कामे माझ्या सारखी खुप प्रलंबीत आहेत यांची शासनाने चौकशी करावी.- अरुण राऊत, तक्रारदार तथा शेतकरी, राउतवाडी लवळे, ता. मुळशी, जि. पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!