आदिवासी कुटुंबीयांची दिवाळी गोड करण्यासाठी माणुसकीचे आनंद कुटी
उपक्रमाचे यंदा १०वें वर्ष

पुणे, (बालाजी नगर): गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनच्या सामाजिक कार्यांतर्गत माणुसकीची आनंद कुटी या स्तुत्य उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण होत असून यंदाच्या आनंद कुटीचा शुभारंभ आज शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी ब्लूमिंग बड्स नर्सरी स्कूल बालाजी नगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रसंगी दोन आदिवासी महिला देखील सहभागी होत्या.
माणुसकीची आनंदकुटी या उपक्रमातून सौ. शारदा विनोद दातीर पाटील व श्री विनोद दातीर हे आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबीयांची दिवाळी आनंददायी साजरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर्षी ही मदत एकूण आठरा गावातील आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबीयांना पोहचवली जाणार असून यासाठी चार ते पाच टन धान्य/ वस्तूंची आवश्यकता पडणार आहे.

उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे, साहेबराव राळे पाटील, लक्ष्मणराव शितोळे पाटील, नीलकंठ थोरात पाटील, तृप्ती ताई मांडेकर पाटील, अरुण केदारी पाटील, शांताराम सातकर पाटील, विजय टिळेकर पाटील, नितीन चोंधे पाटील, गौतम लोखंडे पाटील, नीना ताई तांबे यांच्या सह मित्र परिवार व हितचिंतक उपस्थित होते.
माणुसकीच्या आनंदकुटी मध्ये आपण देखील ऐच्छिक मदत देऊ शकता ज्यामध्ये कोलम तांदूळ, तुरडाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, साखर, गोड तेल आदी पदार्थ सोबतच दीपावली फराळ, आरोग्य कीट, शालेय साहित्य यासाठी आर्थिक मदत देखील आपण येत्या २३ ऑक्टोबर पर्यंत करू शकता असे आवाहन उपक्रमाच्या आयोजका सौ. शारदा विनोद दातीर पाटील यांनी केले.

उपक्रमाविषयी अधिक माहिती हवी असेल तर 9657225538 अथवा 9922897759 या नंबर वर संपर्क करा. व ब्लूमिंग बड्स नर्सरी स्कूल, बालाजी नगर पुणे येथील माणुसकीची आनंद कुटीला अवश्य भेट द्या.