रक्तदानातून साजरी केली अनोखी भाऊबीज
आनंदी प्रतिष्ठानच्या सौ. गौरी पिंगळे यांच्या मोठ्या भाऊबीजीचे सर्वत्र कौतुक
पुणे, (मुंडवा): रक्ताचे दान करत एक आगळीवेगळी भाऊबीज आनंदी प्रतिष्ठानच्या सौ. गौरीताई अक्षय पिंगळे यांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. दिवाळी सणाच्या काळात व यंदाच्या निवडणुकीच्या धामधुमीत पुणे शहर आणि ग्रामीण भागात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून तो भरून काढण्यासाठी आनंदी प्रतिष्ठान आणि रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वर्गीय दिनेश रमेशजी भाटी यांच्या स्मरणार्थ आज भाऊबीजेच्या पवित्र दिवशी दत्त मंदिर, पिंगळे वस्ती, मुंडवा रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आनंदी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा ॲडवोकेट गौरी अक्षय पिंगळे यांच्या मुख्य आयोजनातून घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये रुबी हॉल क्लिनिक रक्तपेढीच्या सहाय्याने ९८ भावांनी रक्तदान केले. तर महिला भगिनींची मोफत हिमोग्लोबिन तपासणी देखील यावेळी करण्यात आली. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक भावाला गौरीताई यांनी भाऊबीजेचे औक्षण करत नारळ व करदोडा भेट देत आशीर्वाद घेतले.
यावेळी रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे राम बांगड, हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप, माजी नगरसेविका मंगलाताई मंत्री, निलेश मंत्री, ओबीसी नेते मंगेश ससाने, सामाजिक कार्यकर्ते अक्षय पिंगळे, दीपक जगताप, गणेश फुलारे, नितीन आरू, अजित ससाणे, सुमित गुप्ता, पंकज दर्शले, वंश मेलकरे, भारत मोरे, प्रशांत शिंगे, वेदांत मेलकरे, मनोज चौगुले सोबतच आनंदी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य व रक्तदाते उपस्थित होते.
गौरीताई यांचे सामाजिक काम पाहता रुबी हॉल क्लिनिक तर्फे त्यांचा विशेष सत्कार देखील या प्रसंगी करण्यात आला.