खिलारेवाडी ते डेक्कन बस स्टॉप दरम्यान प्राचार रॅलीच आयोजन
मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मताधिक्य अधिकच असणार : महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार श्री.सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी खिलारेवाडी ते डेक्कन बस स्टॉप दरम्यान प्राचार रॅली काढण्यात आली.या रॅली दरम्यान ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून,आगामी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रचारावेळी श्री.दत्ताभाऊ खाडे (निवडणूक प्रमुख) श्री.रविंद्र साळेगावकर (सरचिटणीस पुणे शहर) अध्यक्ष छत्रपती,सुनील पांडे उपाध्यक्ष पुणे शहर शिवाजीनगर, श्री.गणेश बगाडे,कार्यकारी अध्यक्ष श्री.शैलेश बडदे,सरचिटणीस डॉ.अजय दुधाने मतदार संघ,श्री.किरण ओरसे, श्री प्रकाश सोलंकी,श्री.रोहन खोमणे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, मागील पाच वर्षाच्या काळात शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांशी संवाद साधत अडीअडचणी सोडविण्याच काम केले आहे.आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे.त्या पार्श्वभूमीवर माझ्या मतदार संघातील खिलारेवाडी येथून आज सकाळी रॅलीला सुरुवात केली आहे.या भागातील माताभगिनी,वडीलधारी मंडळी यांनी आजवर आशिर्वाद दिले.त्या प्रमाणे याही निवडणुकीत मला मतदान करून आशिर्वाद द्यावेत,तसेच महायुती मधील प्रत्येक घटक प्रचारात सहभागी झाला आहे.त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मताधिक्य अधिकच असेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाकडून मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे.यामुळे दत्ता बहिरट आणि मनीष आनंद यांच्यातील मतविभाजनाचा तुम्हाला फायदा होईल का त्या प्रश्नावर ते म्हणाले की,कोणतीही निवडणुक गांभिर्याने घेतली पाहिजे. समोरील पक्षात काय सुरू आहे.यापेक्षा आपण केलेली विकास काम अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल,त्यावर महायुतीचा भर असणार असल्याचे त्यांनी सांगितले