आरोग्यपुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

साचलेला कचरा , डुकरांची आवक-जवक पाहून चंद्रकांत मोकाटे अस्वस्थ

कोथरूड : सागर कॉलनीत आज मंगळवारी सकाळी पदयात्रेद्वारे नागरिकांशी संपर्क साधत असतानाच ओढ्या लागत साचलेला कचरा व त्याभोवती फिरत असलेली डुक्करे पाहून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री चंद्रकांत मोकाटे प्रचंड अस्वस्थ झाले, त्यांनी तातडीने पदयात्रा थांबवली आणि कार्यकर्त्यांना सांगून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, मुकादम व कर्मचाऱ्यांना तातडीने जागेवर बोलावून घेतले आणि साचलेला कचरा दाखवून हे स्वच्छ कधी होणार कचरा असाच पडून राहणार का असा सवाल केला आरोग्य विभागाच्या अधिकारी व मुकादमानी तातडीने स्वच्छ करतो असे सांगितलं व कामास सुरुवातही केली हा प्रसंग मंगळवारी सकाळी 11 ते 11-30 च्या दरम्यान घडला श्री मोकाटे आज सकाळी शास्त्री नगर भागात पदयात्रेद्वारे नागरिकांशी संपर्क साधून मतदान करण्याचे आवाहन करत होते.

त्यावेळी ते सागर कॉलनीत फिरत होते अचानक ते कॉलनीतील वाहणाऱ्या ओढ्याजवळ आले तेव्हा त्यांना या परिसरात प्रचंड अस्वच्छता दिसली ते पाहून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली त्यांनी या परिसरात राहणाऱ्या महिलां व कार्यकर्त्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना मिळालेल्या माहितीने धक्काच बसला या परिसरात साचणाऱ्या कचऱ्याविषयी तक्रारी केल्या तर फारशी दखल घेतली जात नाही कचऱ्याच्या गाडीमागे कचरा टाकण्यासाठी महिलांना पळत जावे लागते स्वछतागृहाची वाईट दुरावस्था आहे.

स्वछतागृहात घाण साचलेली असते ती साफ करण्यास कर्मचारी वेळीअवेळी येतात त्यांनाही आम्हाला सांगावे लागते या अस्वछते मुळे रोगराई पसरण्याचा धोका होतो त्यामुळे येथील रहिवाशी आजारी पडतातअशी गाऱ्हाणी या परिसरातील महिलां रहिवाशी वैशाली कोळेकर, धनश्री बागडे, जनाबाई ठोंबरे, शांताबाई बढेकर आदी महिलांनी श्री मोकाटे यांच्याशी संवाद साधताना सांगितली ही गाऱ्हाणी ऐकून श्री मोकाटे प्रचंड अस्वस्थ झाले ही सर्व गाऱ्हाणं पुणे महापालिकेच्या अधिकारी व मुकादमांसमोर महिलांनी श्री मोकाटे यांना सांगितली.

ही गाऱ्हाणी ऐकून अधिकारी व मुकदम कुलकर्णी साहेब यांनी श्री मोकाटे यांच्यासमोरच तातडीने स्वछता करतो असे सांगितलं तसेच ओढ्याची साफसफाई 4 दिवसात करतो असे सांगितलं श्री मोकाटे यांनी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे त्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच त्यांचे जीवनमान सुधारणार आहे नागरिकांनी व रहिवाशांनी सुद्धा स्वछतेविषयी जागरूक राहिले पाहिजे जनजागृती केली पाहिजे असे नागरिक व रहिवाशांसी बोलताना सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!