पुणे: भारत देशाला सुदृढ,सक्षम व विकसित करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना साई बिझनेस क्लब तर्फे ‘द नेक्स्ट जेन पुरस्कार’ दिल्या जातो. यंदाचा हा पुरस्कार देशभरातील ४५+ जणांना प्रदान करण्यात येणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे, येथे बुधवार दिनांक १३ नंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ यावळेत हा बहारदार सोहळा सर्वांनाच अनुभवता येणार आहे.
अशी माहिती कार्यक्रमाच्या मुख्य आयोजका व साई बिजनेस क्लबच्या संस्थापिका प्रो. डॉ. कृति वजीर यांनी दिली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय पेट्रोन श्रीमती अमिता पारेख, डॉ. कीर्ती शाह, डॉ. कीर्ती लोलगाणी, डॉ. श्रीप्रकाश सोनी यांच्यासह अनेक मान्यवर असणार आहेत.
पुरस्कारासोबतच, मोफत व्यावसायिक नेटवर्किंग, प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज, बी टू बी आणि बी टू सी व मनोरंजनाचा तडका देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.