पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषव्यवसायीक

मेट्रोच्या कामामुळे त्रस्त बाणेर बालेवाडी करांना मोकाटे यांचा वादा

बाणेर बालेवाडी पाषाण परिसरात मेट्रोच्या कामामुळे निर्माण होतं असलेली वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी या परिसरातील नागरिकांना सांगितलं.

श्री मोकाटे यांनी बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातील नागरिकांशी या भागातील समस्याविषयी चर्चा केली तेव्हा मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास लवकरच दूर करू असेही त्यांनी सांगितलं.

हिंजेवाडी ते सिविल कोर्टादरम्यान मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम चालू आहे त्यामुळे बाणेर बालेवाडी व पाषाण परिसरात मोठया प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होतं आहे नागरिकांना घरी जाण्यास दोन ते तीन तास उशिरा होतं आहे या परिसरात काही हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेस रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाण्यास अडथळा येतो ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!