पुणेमहाराष्ट्रविशेष

दलित पँथर संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांची 74वी जयंती साजरी

पॅन्थररत्न पुरस्कारांचे वितरण

पुणे : कालकथित पद्मश्री नामदेव ढसाळ यांची 74वी जयंती दलित पँथरच्या वतीने साजरी करण्यात आली.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून (आरपीआय) केंद्रीय सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, माई कडूबाई खरात, दिव्या शिंदे उपस्थित होते. विद्रोही कवी आकाश सोनवणे, साहित्यिक भगवान धेंडे, आरपीआय महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब जानराव, माता रमाई राष्ट्रीय स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, संजय सोनवणे यांना पँथररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 74 कार्यकर्त्यांना दलित पँथर सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अविनाश महातेकर यांनी मनोगत व्यक्त करताना मागील काळातील आठवणींना उजाळा दिला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक जागरूकता निर्माण झाली.

अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देत नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्व उदयास आले. याप्रसंगी सोमनाथ साळवे, प्रदीप गायकवाड, स्नेहा माने, विशाल ओव्हाळ, गणेश अग्रवाल, आकाश पायाळ, अविनाश मोरे, महेश ढवळे, श्रीकांत लोणारे, अजय वदगल, मुद्दासर शेख, पपू पाटील तसेच कुणाल साठे, ओमकार नडगम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी केले. प्रस्तावना यशवंत नडगम यांनी तर आभार सुवर्णा नडगम यांनी मानले.फोटो ओळ : अविनाश महातेकर यांचा सत्कार करताना मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!