मंगळवार पेठेतील जागेवर आंबेडकर स्मारकासाठी समाज आग्रही
स्मारकासाठी निकाराचा लढा लढण्याची तयारी : राहुल डंबाळे

पुणे : ससुन हॉस्पिटल समोरील मंगळवार पेठेत असलेलेयासजागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उचित स्मारक व्हावे यासाठी आंबेडकरी जनता आग्रही असुन यासाठी सुमारे पंधरा वर्षे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या जागेचा अन्य कारणांसाठी वापर करण्याची मागणी करुन कोणीही सामाजिक तनाव करु नये असे अवाहन रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी केले आहे.
मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना जवळील सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा राज्यसरकारने नुकतीज खाजगा विकसकाला दिलेली आहे. याच जागेच्या अनुषंगाने आंबेडकरी जनतेच्या मागणीनुसार हि जागा स्मारकासाठी मिळावी असा ठराव यापुर्वीच पुणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेला आहे. विकास आराखड्याही ही मागणी नमुद असुन राज्यसरकाने यास सहमती दर्शवली असताना नेमकी हिच जागा खाजगी विकसकाला साठ कोटी रुपयांच्या बदल्यात दिली गेल्याने आंबेडकरी अनुयायांमधे मोठा असंतोष परसरला आहे. याच अनुषंगाने मागील आठवड्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते.

जिल्हाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी चर्चा करुन सदर जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंतन स्मृती जतन करणारे संविधान भवन उभारण्यात येवुन यथोचित स्मारक उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे शिष्टमंडळास कळविले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचे समवेत वारंवार बैठका सुरु असुन हा निर्णय लवकरच होणार असल्याची कुणकुण लागल्यानेच आता या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारका एैवजी अन्य कारणांसाठी जागेचा उपयोग व्हावा अशी मागणी भाजपातील असंतुष्ट माजी नगरसेवक करत आहेत, त्यांच्या या मागणीमुळे सामाजिक तनाव निर्माण होत असुन भाजपा छप्या पध्दतीने आंबेडकर स्मारकाला विरोध करत असल्याची भावना अनुयायांमधे निर्माण होत आहे. असे देखिल डंबाळे यांनी यावेळी सांगितले.
काहीही झाले तरी या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आंबेडकरी अनुयायी आग्रही असुन यासाठी निकाराचा लढा लढण्याची देखिल आमची तयारी असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.