“मी अँण्ड मॉम’च्या व्यासपीठावर आई आणि मुलांचे एकत्रित कौशल्य सादरीकरण
सौ. संतोषी खंडेलवाल यांनी मिळवला स्पर्धेच्या विजेत्याचा मान

पुणे: आजच्या आधुनिक काळात परिवारातील संवाद व एकसाथ वेळ द्यायला देणे कमी झाले आहे. त्याची आई आणि मुलांचे कौशल्य एका व्यासपीठावर सादर करण्यासाठी Stage Bright Events च्या वतीने Me & Mom Pageant 2021 चे आयोजन करण्यात आले होते. Stage bright media च्या संचालिका नेहा मदन वर्मा यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात सादर झालेला हा शो फॅशनच्या जगातील एक अनोखा व प्रक्षकांचे मन जिंकणारा ठरला.
Stage Bright Events आयोजित Me & Mom Pageant 2021चा महाअंतिम सोहळ्या पुणे विमाननगर येथील Hotel Four Points येथे संपन्न झाला. या अंतिम सोहळ्यात एकूण पन्नासहून अधिक स्पर्धक आई व मुले सहभागी झाले होते. शो मध्ये भारतीय पोषाखात रॅमवाक, प्ररिचय, प्रश्न उत्तरे आणि आई मुलांचे एकसाथ Talent Round याच्या आधारावर परीक्षकांनी परीक्षण केले.
Me & Mom Pageant 2021 च्या या पर्वा मधील सहभागी स्पर्धकांच्या सादरीकरणाने show चे Jury पल्लवी कौशिक आणि रोहित शिंदे यांना देखील अचंबित टाकल्याचे दृश्य पाहायला मिळाळे. तरतरी सदर स्पर्धेच्या विजेत्याचा मान संतोषी खंडेलवाल यांनी मिळवला तर 1st Runner up अनुश्रू तसेच 2nd Runner up म्हणून दीपाक्षी श्रृंगारे व सुजाता कुलठे यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख म्हणून अभिनेत्री दिप्ती धोत्रे, डान्सर रूतूजा जुन्नरकर, विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, कलाकार, समाजसेवक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेहा मदन वर्मा म्हणाल्या, अनेक महिलांमध्ये कौशल्य आहे किंतु घरच्या कामात व्यस्त असल्याने महिला स्पर्धेच्या जगात कमी सहभागी होतात. त्या महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहेत. मुलांच्या सोबत व्यासपीठावर एकत्र रॅम व टॅलेंट सादर करण्यासाठी हा शो आयोजित करण्यात आला होता. उत्तम प्रतिसादाबद्दल व कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार त्यांनी यावेळी मानले.