आर्थिकपुणेमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

एसुसचा ‘बियॉन्ड इनक्रेडिबल विथ एसुस’ या उपक्रमाद्वारे पुण्यात सामुदायिक सहभाग

पुणे : तायवानची आघाडीची टेक्नॉलॉजी कंपनी एसुसने पुण्यात आपल्या प्रमुख सामुदायिक उपक्रम ‘बियॉन्ड इनक्रेडिबल विथ एसुस’च्या दुसऱ्या अध्यायाचे आयोजन केले. एंटीसोशल पुणे येथे आयोजित या उत्साही कम्युनिटी मीट-अपमुळे गेमिंग समुदायाला एकत्र आणले गेले आणि दिवसभर चालणाऱ्या संवादात्मक सत्रांत लोकांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला. या सत्रांमध्ये सहभागी नागरिकांनी एसुस ब्रँड व त्यांच्या नव्या उत्पादनांबाबत चर्चा केली.

पहिल्या अध्यायाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाच्या आधारावर, एसुस हा उपक्रम इतर शहरांतही नेण्याची योजना आखत आहे, जेणेकरून लोकांना प्रत्यक्ष उत्पादनांचा अनुभव घेता येईल, त्यावर प्रतिक्रिया देता येईल आणि सामुदायिक संवाद अधिक दृढ करता येईल. पुणे चॅप्टरमध्ये उपस्थितांना आरओजी जेफीरस जी१४, आरओजी फ्लो झेड १३, नुकतेच लाँच झालेले विवोबुक १४ फ्लिप आणि स्नॅपड्रॅगन-संचालित झेनबुक ए १४ यांसारख्या नाविन्यपूर्ण उत्पादनांबाबत माहिती मिळाली.या कार्यक्रमात थरारक लाइव्ह गेमिंग बॅटल्स, विशेष प्रॉडक्ट डेमो, क्रिएटर सेशन्स आणि क्रिएटर्ससोबत थेट संवाद यांचा समावेश होता. गेमर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांनी व्यावसायिक दर्जाच्या गेमिंग, स्ट्रीमिंग व कंटेंट क्रिएशनसाठी खास डिझाइन केलेल्या नवीनतम आरओजी लॅपटॉप्स व अॅक्सेसरिजचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या प्रसंगी बोलताना कंझ्युमर आणि गेमिंग पीसी, एसुस इंडियाचे उपाध्यक्ष अर्नोल्ड सू म्हणाले, ‘बियॉन्ड इनक्रेडिबल विथ एसुस’ या उपक्रमाद्वारे आम्ही आमच्या समुदायाशी तंत्रज्ञानाबाबत अर्थपूर्ण व प्रत्यक्ष संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही मोहीम म्हणजे लोकांच्या अपेक्षा व आकांक्षांवर लक्ष केंद्रित करून असे उत्पादन तयार करणे, जे केवळ आजच्या गरजा पूर्ण करत नाही, तर झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीला देखील पूरक ठरेल. आमच्यासाठी ग्राहक म्हणजे सहप्रवासी आहेत, आणि या उपक्रमाद्वारे आम्ही त्यांच्याशी अजून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहोत.’

बेंगळुरूमध्ये झालेल्या पहिल्या ‘बियॉन्ड इनक्रेडिबल विथ एसुस’ उपक्रमास मिळालेल्या यशानंतर, त्याचा दुसरा अध्याय पुण्यात पार पडला. या संवादात्मक व्यासपीठामुळे एसुसच्या संपूर्ण इकोसिस्टीमशी, ज्यात समुदाय सदस्य, कंटेंट क्रिएटर्स आणि स्थानिक मीडिया यांचा समावेश आहे, अधिक जवळीक साधता आली. बेंगळुरूतील पहिल्या चॅप्टरमध्ये ८५ पेक्षा अधिक सहभागी होते. पुण्यातील उपक्रमामध्ये स्थानिक तंत्रज्ञान समुदायाला आसुसच्या नवकल्पनांचा अनुभव घेण्याची, ज्ञानवर्धक सत्रांमध्ये सहभागी होण्याची आणि ब्रँडशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. आता एसुस हा सामुदायिक उपक्रम २०२५ दरम्यान भारतातील इतर प्रमुख महानगरांमध्येही विस्तारण्याच्या तयारीत आहे. कस्टमाइझ्ड अनुभव देणे, सहयोगात्मक मंच उपलब्ध करणे, वापरकर्त्यांना नव्या इनोव्हेशनपर्यंत लवकर पोहोच मिळवून देणे आणि एक सशक्त व सक्रिय टेक कम्युनिटी तयार करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे –

एसुस विषयी एसुस ही जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असून, ती नाविन्यपूर्ण, बुद्धिनिष्ठ आणि वापरकर्ता-केंद्रित उपकरणे, कॉम्पोनंट्स आणि सोल्यूशन्स पुरवते, ज्यामुळे लोकांचे जीवन अधिक समृद्ध होऊ शकते. पाच हजारहून अधिक इन-हाऊस आर अँड डीतज्ज्ञ असलेल्या टीमसह, एसुसने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुनःविचार करत पुढच्या पिढीसाठी ते पुन्हा आकारण्याचे काम केले आहे. कंपनीला दररोज ११ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार गुणवत्ता, डिझाइन आणि नाविन्य याबाबतीत मिळतात. तसेच फॉर्च्यूनच्या ‘जगातील सर्वाधिक प्रशंसित कंपन्या’ या यादीमध्येही तिचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!