गणेश चप्पलवार यांना कृषी पर्यटनरत्न पुरस्कार
Pune: शेतकरी, कृषी पर्यटन चालक आणि पर्यटकांसाठी गेल्या चार वर्षांपासून शेतकर्यांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा घेणे. कृषी पर्यटन चालकांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे. पर्यटकांसाठी वेगळा अनुभव घेण्यासाठी सहलींचे आयोजन कृषी पर्यटन विश्नच्या माध्यमातून करत आहेत. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटनाचे प्रचार व प्रसार करण्याचे काम करत आहेत. शेतकर्यांना कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसायाचे महत्व पटवून देण्याचे काम कृषी पर्यटन विश्व करत आहे. शेकडो शेतकर्यांना सल्ला दिले आहे. कृषी पर्यटनाचे उत्तम मार्केटिंग करत असल्यामुळे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात पर्यटनरत्न पुरस्कार अॅग्रो टुरिझम विश्वचे संस्थापक प्रा. गणेश चप्पलवार यांना प्रदान करण्यात आले आहे.
पर्यावरण, पर्यटन, कृषी, सामाजिक, संगीत, साहित्य, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, स्वागताध्यक्ष डॉ. बबन जोगदंड, उद्घाटक स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, प्रमुख अतिथी म्हणून धर्मदाय आयुक्त सु. मु..बुक्के आदी मान्यवर उपस्थित होते.
अँग्रो टुरिझमचे कार्य:- अँग्रो टुरिझम विश्वच्या माध्यमातून गेली चार वर्ष शेतकरी, कृषी पर्यटन चालक व पर्यटकांसाठी हक्काच व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अँग्रो टुरिझम विश्वच्या माध्यमातून कार्यशाळा, प्रशिक्षण घेणे, पर्यटन, पर्यावरण आणि कृषी दिनी परिषद व संमेलन घेत असतात. आतापर्यंत 15 कृषी पर्यटन प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. शेकडो शेतकर्यांसह इच्छुकांना ग्रामीण व कृषी पर्यटनाविषयी मार्गदर्शन केले आहे.
- पर्यटन विषयी अनेक पैलूवर विशेष Talk show च्या माध्यमातून मुलाखती घेणे व फिल्म बनवले आहेत.
- शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थांना किफायतशीर दरात सहली आयोजन करणे.
- राज्याच्या पर्यटन वाढिसाठी पर्यटन व पर्यावरणाचे प्रचार व प्रसार करणे
- ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांना पर्यटन व ग्रामीण पर्यटना विषयी मोफत कार्यशाळा घेतलीय
- पर्यटन, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील कार्य करणा-यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
– त्यांच्या साहित्याला व कलेला विविध पुरस्काराने सन्मानित करत आहे. - १६ मे जागतिक कृषी पर्यटन दिवस,
– २७ सप्टेंबर विश्व पर्यटन दिवशी पर्यटनाच्या विविध पैलू विषयी मान्यवरांसोबत अनेक चर्सचात्र, मुलाखती, वेबीनार घेत असतो.