पुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत ‘हजार राहे या हिंदी सदाबहार गीतांच्या कार्यक्रम

के टू पी बिट्स प्रस्तुतीला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद

पुणे – के टू पी बिट्स प्रस्तुतअनुपमा कुलकर्णी ,सारंग कुलकर्णी, पराग मुळे यांची संकल्पना व निर्मिती असलेला राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत केलेल्या हजार राहे या सदाबहार हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन 26 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथील सभागृहात सायंकाळी 5 ते 8 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी दैनिक नवभारत पुणे आवृत्तीचे ब्युरो चीफ शैलेंद्र सिंग, पुण्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक राजीव तिवारी, दैनिक नव भारतचे सुधीर देशमुख, के टू बिट्स चे व हजार राहे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अनुपमा कुलकर्णी ,सारंग कुलकर्णी, पराग मुळे, ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष झोहेर चुनावाला, ज्ञानश्री फाउंडेशन चे उपाध्यक्ष अमर काळे,श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शन चे संचालक व हजार राहे कार्यक्रमाचे सहआयोजक विवेककुमार तायडे,श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे व्यवस्थापक व हजार राहे कार्यक्रमाचे सहआयोजक प्रशांत निकम , दैनिक नव भारतचे अनिल शिरसाठ, माध्यम समन्वयक करुणा पाटील, क्रीडा खेळाडू वैशाली चिपलकट्टी,एम.जे असोसिएट चे संचालक मनीराम गुप्‍ता आदी मान्यवर उपस्थित होते.

या के टू बिट्स प्रस्तुत ‘हजार राहे’ कार्यक्रमासाठी दैनिक नवभारत व दैनिक नवराष्ट्र हे माध्यम प्रायोजक होते.या कार्यक्रमाचे सह आयोजन श्रावी मीडिया व फिल्म प्रोडक्शन तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष व व्यावसयिक झोहेर चुनावाला यांना बंगलोर येथे बिपाशा बासू यांच्या हस्ते बिझनेस अवार्ड मिळाल्याबद्दल व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

के टू पी बीटस तर्फे यापूर्वी वृद्धाश्रमासाठी किशोर कुमार व मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गीतांचे सामाजिक जाणिवेतून,’ नीले नीले अंबर ‘ व ‘गूंजी सी है ‘अशा प्रकारच्या संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मेरे नैना सावन भादो, तूने ओ रंगीले कैसा जादू किया, शायद मेरी शादी का खयाल, हमे और जीने की, नदिया से दरिया, मै शायर,हमे और जीने की, रूप तेरा मस्ताना, अच्छा तो हम चलते है, हजार राहे, एक अजनबी हसीना से, गुन गुना रहे हैं भवरे, जय जय शिवशंकर या बहारदार गीतांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या हजार राहे या सदाबहार हिंदी गीतांच्या कार्यक्रमात अनुपमा कुलकर्णी सारंग कुलकर्णी , पराग मुळे ,प्रशांत निकम, मोना भोरे ,उदय कुंडलकर, अश्विनी कुलकर्णी, अतुल गर्दे, साधना शर्मा या गायकांनी आपली बहारदार गीते सादर केली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक राजीव तिवारी यांच्या ये रेशमी जुल्फे या गीतास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पुण्यातील प्रसिद्ध निवेदक आकाश सोळंकी यांनी केले . या कार्यक्रमासाठी ध्वनी संयोजन व छायाचित्रण हेमंत उत्तेकर व शीतल हुंडेकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे स्थिर चित्रण नागेश झळकी यांनी केले. या के टू बिट्स प्रस्तुत ‘हजार राहे’ कार्यक्रमासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे प्रायोजक होते.

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शन तसेच ऑनलाइन माध्यम प्रायोजक न्यूज24लाईव्ह होते. या हिंदी सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन के टू पी बीटसचे अनुपमा कुलकर्णी, सारंग कुलकर्णी ,पराग मुळे,श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे संचालक विवेककुमार तायडे,,श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे व्यवस्थापक प्रशांत निकम यांनी केले होते .कोरोना महामारी च्या पार्श्वभूमी मुळे फिजिकल डिस्टनसिंगचे सर्व शासकीय नियम पाळून हा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!