पुणे :’आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’च्या वतीने ‘एईएसए व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ’ शुक्रवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. जयसिम फाउंटनहेड (बंगळुरू)चे संचालक आर्किटेक्ट कृष्ण राव जयसिम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात होती.
आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा आणि सर्वोत्तम बांधकाम प्रकल्पांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. हा पारितोषिक वितरण समारंभ १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कम्म्युनिटी हॉल,पीवायसी जिमखाना येथे झाला. पारितोषिक वितरण समारंभाचे हे २८ वे वर्ष होते.प्रत्येकी ५० हजार रक्कम ,मानचिन्ह असे या पारितोषिकांचे स्वरूप होते. रहिवासी बंगला,इमारत,सोसायटी,इन्स्टिट्यूट,उद्योग,कार्यालय,पूल बांधणी,उद्यान,रेस्टोरंट,दुरुस्ती आणि संवर्धन,युवा आर्किटेक्ट अशा अनेक गटातून ही पारितोषिके दिली गेली.तज्ज्ञांच्या समितीने या प्रकल्पांचे परीक्षण करून नावे निवडली.
बांधकाम क्षेत्रातील नवनिर्मितीचा गौरव
या कार्यक्रमात एकूण ११ प्रकल्पांना गौरविण्यात आले.मुख्य पुरस्कारामध्ये ६ प्रकल्पांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ते पुढीलप्रमाणे : आऊट साईड पुणे ( इन्स्टिट्यूट विभाग) मध्ये आय.टी.स्पोर्टस कॉम्प्लेक्स , गांधीनगरला पारितोषिक मिळाले. , पुण्यात अरहिवाशी विभागात एसा बेहेरे -राठी पारितोषिक संवर्धन विभागात भाऊसाहेब रंगारी भवन,इन्फ्रा प्रकल्पासाठी स्ट्रीट लॅण्डस्केप पिंपळे गुरव ,उद्योग विभागासाठी विलो मॅथर अॅण्ड प्लाट यांना पारितोषिक देण्यात आले.रहिवासी विभागात कॅनोपी हाऊस,ग्रुप हाऊसिंग विभागात एसा कुमार पारितोषिकाचे ‘ यशदा एपीक ‘विजेते ठरले.ज्युरींच्या वतीने निवडण्यात आलेल्या प्रकल्पांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ते पुढील प्रमाणे :ग्रीन इनिशिएटिव्ह साठी सिग्मा इलेक्ट्रिकल्स, बांधकामासाठी एबीबी इंडिया लिमिटेड , बांधकाम विभागात एमआयटी स्कूल ऑफ डिझाईन, अॅडाप्टेड रियुज विभागात द आऊट स्कुल , द अँटीक हाऊस या प्रकल्पाना पारितोषिक मिळाले.
बांधकाम क्षेत्रातील कल्पक नवनिर्मितीचे दूत व्हा : राजीव मिश्रा
कृष्णराव जयसिम म्हणाले, ‘ बांधकाम क्षेत्र वेगाने प्रगती करीत आहे.बांधकाम क्षेत्रात सर्व्हेअर्स चे महत्वाचे स्थान आहे. त्यांच्याशिवाय आर्किटेक्ट, इंजिनियर्स यांचे काम उत्तम होऊ शकत नाही. मानवी आयुष्यात हे सर्व व्यवसाय महत्वाचे योगदान देत आले आहेत. अभियंत्यांनी सुद्धा सर्वेक्षण क्षेत्रात आले पाहिजे. त्यांचे भवितव्य उत्तम आहे. सर्वेक्षणात तांत्रिक गोष्टींबरोबर जमिनीवरचे वास्तव टिपले पाहिजे.या प्रवासात चांगल्या गोष्टी घ्यावेत, वाईट गोष्टी टाकून द्याव्यात.राजीव मिश्रा म्हणाले, ‘ क्रिएटिव्ह इकॉनॉमीकडे लक्ष द्यायला हवे. त्यात अभियंता, आर्किटेक्ट सर्वांनी योगदान द्यावे. भविष्यात मोठी लोकसंख्या शहरात राहणारी असणार आहे.शहरे सुंदर होण्यासाठी बदलाचे दूत व्हावे. वाहतूक सुधारणा हे भविष्यातील आव्हान असणार आहे. आर्किटेक्ट , इंजिनिअर्स असोसिएशन चे या क्षेत्राला प्रोत्साहन देणारे हे प्रयत्न महत्वाचे आहेत.’आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ चे प्रेसिडेंट इंजिनिअर पराग लकडे यांनी प्रास्ताविक केले.चेअरमन आर्किटेक्ट महेश बांगड, अशोक बेहेरे,सुहास लुंकड, सुहास जंगले,विश्वास कुलकर्णी, खजिनदार हेमंत खिरे,सहसचिव मनाली महाजन , संजय तासगावकर,शेखर गरूड, दिवाकर निमकर, नितिन भोळे, निनाद जोग, सुजाता कर्वे, आदी मान्यवर उपस्थित होते. राजीव राजे यांनी आभार मानले.
असोसिएशनचे माजी अध्यक्ष आर्कीटेक्ट पुष्कर कानविंदे हे या पारितोषिक वितरण सोहळ्याचे निमंत्रक होते. एस जे काँट्रॅक्ट्स प्रा लि ,कुमार प्रॉपर्टीज,रोहन बिल्डर्स,कुमार बिल्डर्स प्रा लि ,बेहरे -राठी ग्रुप ,स्ट्रक्चरल डिझायनर्स अँड कन्सल्टंट्स प्रा लि यांचे सहकार्य या सोहळ्याला लाभले . ‘कल्प ‘ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पुण्याच्या विकासात ५३ वर्षांचे योगदान: ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन'(ए ई एस ए ), पुणे ही शहराच्या सर्वांगिण सुधारणेसाठी सर्व प्रकारच्या बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी १९७० मध्ये स्थापन झालेली एक आगळीवेगळी संस्था आहे. ज्ञानाचा प्रसार, मूल्याधारित व्यवसाय, आणि स्थानिक सरकारी संस्थांबरोबर सामंजस्याने काम करण्याठी संस्था सतत कार्यरत असते. यामुळे असोसिएशनला आणि व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिकांना बांधकाम क्षेत्रात मानाचे स्थान आहे.
