Uncategorized

मनोरा आमदार निवासाच्या प्रस्तावित बांधकामाच्या कामात वेळेचे नियोजन आणि आवश्यकता अंतर्गत सुविधांसह काम लवकर पूर्ण करा : विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : प्रस्तावित मनोरा आमदार निवासाच्या बांधकामाला वेळेचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आमदार निवासाच्या बांधकाम करताना येथे आवश्यक त्या अंतर्गत सुविधा दर्जेदार पद्धतीने झाल्या पाहिजेत. याचबरोबर प्रत्येक कामाचे नियोजन करताना आवश्यक वेळ आणि इतर अनुषंगिक बाबींचे विचार करून हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आज विधान परिषदेच्या उपसभापती यांनी येथे केले.

विधान भवनात आज आयोजित मनोरा आमदार निवासाच्या नियोजनाबाबत बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री.देवेंद्र फडणवीस,संसदीय कार्यमंत्री ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याचबरोबर विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत,प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे आदी उपस्थित होते.

या बैठकीत मनोरा आमदार निवासाच्या उभारणीबाबत आवश्यक तांत्रिक मान्यता देणेत आली आहे तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता ही देणेत येणार असले बाबत सकारात्मक चर्चा झाली. पर्यावरण विभागाची परवानगी पुढील सात दिवसात वास्तुविशारद यांनी घ्यावी. तसेच वार्षिक देखभाल एजन्सी ही नियुक्तीबाबत चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!