Uncategorized

सामूहिक तुलादान आणि सुन्दरकाण्ड चे उत्साहात संपन्न

Pune: विदर्भ महेश मंडळ ही संस्था मागील 20 वर्षापासून पुण्यात कार्यरत आहे . समाजकार्य हेच मुख्य ध्येय या संकल्प नेतून या संस्थेची स्थापणा करण्यात आली आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून ही संस्था प्रत्येकवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करते. तसेच इतर संस्थांना त्यांच्या आयोजना मध्ये विशेष सहकार्य करते.

संस्थेचे सर्व सभासद इतरांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात. हिच परंपरा पुढे नेत संस्थेने या वर्षी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर सामूहिक तुलादान आयोजित केले. या कार्यक्रमा अंतर्गत 21 लोकांचे तुला दान करून त्यांच्या वजना येवढे धान्य , पुस्तके व गौ खाद्य विविध गरजू संस्थांना वितरित करण्यात आले. याच दिवशी विदर्भ मिरा सूश्री अलकाश्रीजी यांच्या भव्य संगीतमय सुन्दरकाण्ड चे आयोजन करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमात सुमारे 1000 लोकांनी सामुहिक सुन्दरकाण्ड पठण केले. सुश्री अलका श्रीजी यांनी संस्थेच्या विविध समजोपयोगी कार्याची प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदर्भ महेश मंडळाच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी व सभासदांनी विशेष सहकार्य केले . या कार्यक्रमा साठी पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांनी उपस्थिती दर्शविली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!