Uncategorized

हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीचे आयोजन

Pune: वैशाख शु. ३, (अक्षयतृतीया) दि. २२ एप्रिल २०२३ रोजी जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्त्य साधून “हिंदू वीरशैव लिंगायत मंच” या वीरशैव लिंगायत समाजात कार्य करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने “महात्मा बसवेश्वर जयंती” चे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु वीरशैव लिंगायत मंचाच्या पुणे महानगर शाखे तर्फे पुणे शहरातील बाजीराव रास्ता, महाराणा प्रताप उद्यान येथे म. बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

सकाळी ठीक ९ वा म. बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुण्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटिल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण होईल, तसेच कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा. श्री. महेश सिद्धलिंग कुगांवकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील, नंतर महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे महिलांच्या हस्ते पूजन होऊन कार्यक्रमाचा समारोप होईल. अशी माहिती आशिष अमरनाथ हिंगमिरे (माध्यम पदाधिकारी- हिंदु वीरशैव लिंगायत मंच प.महाराष्ट्र) यांनी दिली.

सोबतच समस्त हिंदु बांधव तसेच माता-भगिनींनी कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन देखील केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!