क्रीडापुणेमहाराष्ट्र

देशातील प्रतिष्ठेच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीगचा एके पुना लाइन्स संघ विजेता

पुणे: ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आयोजीत ऑक्सफर्ड गोल्फ लीगचा अंतिम सामना एके पुना लायन्स विरुद्ध रोरिंग टायगर्स नागपूर यांच्यामध्ये अतिशय चुरशीचा झाला . या सामन्यात पुना लायन्स ने बाजी मारत ऑक्सफर्ड गोल्फ चषकावर आपले नाव कोरले .रोरिंग टायगर्स नागपूर ने ९.५ गुण मिळवले तर पुना लाइन्स १०.५ गुण मिळवित विजयावर शिक्कामोर्तब केले .या संघाचे कप्तान राजीव पुसाळकर आणि उपकप्तान अँड्र्यू पिंटो ,रोंनाक जैन ,श्रीराम सुभ्रमण्यम ,विनय अग्रवाल ,सचिन रणभीसे ,दिनेश सूद ,रमेश कौशिक ,सतीश सिंग ,राज दत्ता ,बलराजसिंग परमार ,सुभ्रमण्यम एम.के,मिक्युंग जिऑंग,सुजित कक्कड हे खेळाडू या संघात सहभागी होते .सांयकाळी दिमाखदार अशा सोहळ्यात विजयी संघाला अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा चषक ऑक्सफर्ड गोल्फ क्लबचे अनिल सेवलेकर व एस.गोल्फिंगचे आदित्य मालपणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .याबरोबरच चार लाखाचे बक्षीस ही देण्यात आले .

याच संघातील रोनक जैन या खेळाडूस लीगचा सर्वोउत्कृष्ठ खेळाडू हा किताब मिळाला . रोरिंग टायगर्स नागपूर हा संघ उपविजेता ठरला . या संघाला दुसऱ्या क्रमाकाचे परितोषक देण्यात आले . लीगमध्ये देशभरातील सुमारे आठ संघ सहभागी झाले होते ,ते इगल फोर्सेस ,शुब्बान सनराइजेस ,ऐस.जे. सुलतान ऑफ स्विंग ,रोरिंग टायगर्स नागपूर ,एके पुना लायन्स ,द लीजन्सी क्लब ,विंग वॉरियर्स ,ग्रीन ग्लॅडिएटर्स यांचा समावेश होता .एका संघामध्ये पंधरा खेळाडू सहभागी झाले होते .

आठ संघामध्ये एकूण १२० देशभरातील नामांकित खेळाडू सहभाग घेऊन खेळत होते .देशातील सर्वात नयनरम्य आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा ऑक्सफर्ड गोल्फ क्लब मध्ये ही स्पर्धा पार पडली .त्यामुळे या लीगला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!