पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

गणेश लोंढे यांना राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीचे अध्यक्ष पद

Pune: राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहर यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. सदर बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच या प्रसंगी पक्षाचे जुने नेते गणेश लोंढे यांना राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीचे अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव माऊली नाना सलगर यांनी यावेळी निवडीचे पत्र गणेश लोंढे यांस सुपूर्द केले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, युवक अध्यक्ष अजित दादा पाटील, समन्वयक सचिन गुरव, पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष पेद्दी ताई, जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, शहराध्यक्ष बालाजी पवार, महिला शहराध्यक्ष किरवे ताई व शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!