राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यात निषेध आंदोलन
पुणे: राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना पोलिसांनी अटक केल्याप्रकरणी पुण्यात अलका टॉकीस चौकात कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. महादेव जानकर यांनी राज्यात जनसुराज्य यात्रा काढून जनजागृती निर्माण करत आहे.
या यात्रेला मिळत असलेला लोकांचा पाठिंबा व गर्दी पाहून सरकारने या गोष्टीची धास्ती घेतली यामुळेच मुंबईत आज दहिसर अंधेरी हायवे नजीक जनसुराज्य यात्रा आली असता पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यामुळे पुणे शहरात महादेव जानकर यांना जामीन मंजूर करून सुटका होत नाही तोपर्यंत निषेध आंदोलन कार्यकर्त्यांच्या वतीने केले गेले.
या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, पश्चिम महाराष्ट्र अनुसूचित जमाती अध्यक्ष गणेश लोंढे, समन्वयक सचिन गुरव, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष कोंढाळकर ताई, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष टंकसाळे, पुणे शहर महिला अध्यक्ष सुनीता किरवे, पुणे शहर महिला उपाध्यक्ष वैशाली जाधव, अध्यक्ष बिरुदेवा अनुसे, माळशिरस तालुका अध्यक्ष नारायण देवकाते, नामदेव सुळे, नारायण यमगर, ऋषिकेश कोकरे आदी सहभागी होते.