पुणे: मार्जिन ट्रेड फंडिंग (एम.टी.एफ) यास सोप्या भाषेत समजूण घ्यायचे म्हणजे मार्जिन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार एखाद्या विशिष्ट सत्रात स्टॉकच्या हालचालीचा अंदाज लावतात. इलेक्ट्रॉनिक स्टॉक एक्स्चेंजमुळे मार्जिन ट्रेडिंग आता अगदी छोट्या व्यापाऱ्यांनाही उपलब्ध आहे. मार्जिन ट्रेडिंग ची प्रक्रिया अगदी सोपी आहे. मार्जिन खाती गुंतवणूकदारांना ते खरेदी करू शकतील त्यापेक्षा जास्त शेअर्स खरेदी करण्याचे साधन देतात. जर तुम्ही एमटीएफसाठी पात्र असाल तर तुम्ही स्टॉक्सवर तुमच्या ब्रोकर ने प्रदान केलेल्या मार्जिन ट्रेड फंडिंग (MTF) श्रेणीत घडणारे बदल पाहू शकता.
स्टॉक वरील ही मार्जिन फंडिंगची टक्केवारी ब्रोकरच्या विविध निकषांच्या आधारे ठरविली जाते, जसे की:
१- स्टॉकच्या रिस्क प्रोफाइलमध्ये अस्थिरता किती आहे, प्रोफाइलची लिक्विडिटी, त्याच्या किमतीत होणारे चढ-ऊतार, बाजारतील भांडवल इत्यादींचा यात समावेश होतो. साधारणतहा, ब्रोकर ने परवानगी दिलेला आणि जास्त जोखीम असलेल्या स्टॉक मुळे मार्जिंग फंडिंग ची टक्केवारी कमी होते.
२- स्टॉकचे रेग्युलेटरी फ्रेमवर्क, ज्यामध्ये नियामकांद्वारे निर्धारीत केलेली मार्जिन ट्रेडिंगसाठी विशिष्ट पात्रता समाविष्ट असते, यात एक्स्चेंज , देखरेख सूचीमधील त्याचा समावेश, सेटलमेंटच्या प्रकारातील बदल आणि विविध मार्जिनिंग संबंधित नियमांचे पालन महत्वाचे ठरतात. सामान्यतः जेथे, नियामक आदेशांचे पालन होते अश्या स्टॉकला जास्त टक्के मार्जिन फंडिंग दिले जाते कारण ते कमी नुकसानदायी असतात.
३- शेअरची मागणी आणि पुरवठा, यामध्ये कर्ज देण्याची आणि कर्ज घेण्यासाठीची उपलब्धता, गुंतवणूकदार आणि व्यापार्यांमध्ये त्याची लोकप्रियता किती आहे तसेच बाजारात त्या बद्दल काय मते आहेत या गोष्टी महत्वपूर्ण ठरतात. साधारणपणे, मागणी जास्त आणि पुरवठा कमी, असणार्या स्टॉकवर मार्जिन फंडिंग ची टक्केवारी कमी मिळते.
हे निकष ब्रोकर टू ब्रोकर आणि प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म बदलू शकतात, याचबरोबर बाजारातील परिस्थिती, जोखीम, मूल्यांकन आणि ब्रोकरच्या विवेक बुद्धीनुसार देखील हे निकष बदलू शकतात.
म्हणूनच, मार्जिन ट्रेडिंग सुविधा वापरण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक स्टॉक साठी फंडिंग रेंजची नवीन टक्केवारी नेहमी तपासली पाहिजे. तुमच्या गरजांसाठी सर्वोत्तम डील शोधताना तुम्ही वेगवेगळ्या ब्रोकर्स आणि प्लॅटफॉर्म वरील वेगवेगळ्या ऑफर आणि दरांची तुलना देखील करू शकता.