क्विक हील फाऊंडेशनतर्फे ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ पुरस्कार २०२४ आयोजन
५० लाखांहून अधिक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला
पुणे, १० फेब्रुवारी २०२४: क्विक हील फाऊंडेशन या जागतिक सायबर सुरक्षा सोल्यूशन्स प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सीएसआर शाखेने पुण्यात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ पर्वाचे आयोजन केले. या समारोहामध्ये शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांना प्रशंसित करण्यात आले, ज्यांनी त्यांचा प्रमुख उपक्रम ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ‘मध्ये सहभाग घेतला.
क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अनुपमा काटकर, जळगाव येथील कवियत्री बहीणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रो. व्ही. एल. महेश्वरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रो. (डॉ.) प्रकाश ए. महानवार, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक श्री. संजय शिंत्रे आणि २९ सहभागी संस्थांमधील शिक्षणतज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते.’सायबर सुरक्षेसाठी ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमाचा जनतेमध्ये, विशेषत: समजाच्या वंचित समुदायांमध्ये सायबर सुरक्षिततेचे महत्त्व आणि डिजिटल विश्वामध्ये पालन करावयाच्या सर्वोत्तम पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करण्यासह त्यांना शिक्षित करण्याचा मनसुबा आहे.
या उपकमाने ४७ लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षण आणि सामान्य व्यक्तींना स्थानिक शैक्षणिक संस्थांसोबत सहयोग व पथनाट्यांच्या माध्यमातून सायबरसुरक्षेच्या विविध पैलूंबाबत जागरूक केले आहे, जसे सायबर धोके ओळखणे, सायबर हायजिनचा सराव करणे, सायबर कायदा व सायबर नैतिकेचे पालन करणे. याच उपक्रमांतर्गत फाऊंडेशनने ‘अर्न अँड लर्न’ उपक्रम लाँच केला, ज्याचा देशातील तरूणांना सक्षम करण्याचा मनसुबा आहे. हा उपक्रम विद्यार्थी स्वयंसेवकांना देशाचे भावी लीडर्स बनण्यासाठी त्यांचे कौशल्य अधिक निपुण करण्यास साह्य करण्यासह प्रशिक्षण देतो.
हे विद्यार्थी सर्वात सर्जनशील पद्धतीने मोठ्या प्रमाणात समुदायांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकतेचा प्रसार करतात. गेल्या वर्षी या उपक्रमाने ८ लाखांहून अधिक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. या पुरस्कारांसाठी नामांकन महाराष्ट्र व कर्नाटकमधील ६ झोन्स सहभागी झाले. कृती, क्रियाकलाप व पोहोच प्रयत्नांसंदर्भात महाविद्यालयांकडून मिळालेल्या डेटाच्या आधारावर सायबर सुरक्षा वॉरियर्स (विद्यार्थी), सायबर सेफ्टी चॅम्पियन्स (शिक्षक) आणि सायबर शिक्षा चॅम्पियन ऑफ द इअर (संस्था) या श्रेणींअंतर्गत पुरस्कार देण्यात आले.
सायबर वॉरियर्स पुरस्कार ३ श्रेणींमध्ये देण्यात आला – बेस्ट प्रोसेस कम्प्लायन्स, हायेस्ट आऊटरिच अँड इम्पॅक्ट आणि आऊटस्टॅण्डिंग परफॉर्मन्स, तर सायबर सेफ्टी चॅम्पियन्स पुरस्कार २ श्रेणींमध्ये देण्यात आला – बेस्ट प्रोसेस कम्प्लायन्स आणि एक्स्ट्रा माइल रेकग्निशन. सायबर शिक्षा चॅम्पियन्स पुरस्कार ३ श्रेणींमध्ये देण्यात आला – बेस्ट प्रोसेस कम्प्लायन्स, स्पेशल अॅप्रीसिएशन फॉर मीडिया आऊटरिच आणि क्रिएटिव्ह परफॉर्मन्स. प्रत्येकी सहा विजेत्यांसह विविध श्रेणींमध्ये सर्व स्वयंसेवकांचे अपवादात्मक योगदान व कामगिरी पाहायला मिळाली.याप्रसंगी मत व्यक्त करत क्विक हीलच्या ऑपरेशनल एक्सलन्सच्या प्रमुख आणि क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अनुपमा काटकर म्हणाल्या, ”मला आमच्या सीएसआर उपक्रमांच्या सर्वोत्तम परिणामांना सादर करताना अभिमान वाटत आहे.
या उपक्रमांनी ५० लाखांहून अधिक व्यक्तींच्या, विशेषत: देशाच्या दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ पुरस्काराच्या २०२४ एडिशनच्या माध्यमातून या उपलब्धीला साजरे करण्यासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. हा महत्त्वपूर्ण समारोह जनतेपर्यंत सायबर सुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश प्रसारित करण्याप्रती कटिबद्धता दाखवलेल्या स्वयंसेवी संस्था, समर्पित शिक्षक आणि उत्साही विद्यार्थ्यांच्या बहुमूल्य योगदानाला प्रशंसित करतो.
तसेच या समारोहामधून आपल्या देशाचे भावी लीडर्स म्हणजेच तरूणंना प्रेरित व सक्षम करण्याप्रती आमची अविरत कटिबद्धता देखील दिसून येते. आम्हाला ‘सर्वांसाठी मुलभूत अधिकार म्हणून सायबर सुरक्षा’ स्थापित करण्याच्या आमच्या मिशनमध्ये साह्य करणारे आमचे सर्व सहयोगी, स्थानिक राज्य प्रशासन, पोलीस, महाराष्ट्र सायबर आणि नॅसकॉमसह उद्योग संस्था यांचे मी मनापासून आभार मानते. सहयोगाने, आमचा चळवळीला चालना देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे अधिकाधिक व्यक्तींना सायबर सुरक्षित व सुनिश्चित भारत निर्माण करण्यासाठी आमच्यासह सामील होण्यास प्रेरणा मिळेल.”
क्विक हील फाऊंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक करत महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक श्री. संजय शिंत्रे म्हणाले, ”आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, ज्यामुळे सायबरसुरक्षितता व सुरक्षेबाबत जागरूकतेच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. क्विक हील फाऊंडेशनचे सामान्य जनतेला सायबरगुन्ह्यांबाबत जागरूक राहण्यास माहिती प्रदान करत सुसज्ज करण्याचे प्रयत्न वाखणण्याजोगे आहे. मी अनुपमा काटकर आणि त्यांच्या टीमचे त्यांनी आपल्या देशाला सुरक्षित करण्यामध्ये केलेल्या अपवादात्मक कामगिरीसाठी मनापासून अभिनंदन करतो.
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमामधून सायबर-सुरक्षित वातावरण निर्माण करण्याप्रती त्यांची समर्पितता दिसून येते आणि मी सायबरसुरक्षा शिक्षणक्षेत्रात लक्षणीय प्रभाव निर्माण करण्याप्रती त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो.”जळगाव येथील कवियत्री बहीणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रो. व्ही. एल. महेश्वरी म्हणाले, ”मला क्विक हील फाऊंडेशन आणि ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमाशी संलग्न असण्याचा आनंद होत आहे. हा उपक्रम सायबरसुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देतो, तसेच थोर कार्य आहे, जो आपल्या देशाच्या भविष्याला आकार देतो. या प्रयत्नामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रेरित केल्याने त्यांची कौशल्ये वाढण्यासह ते आजीवन यशस्वी होण्यास सक्षम देखील होतात. मला आमच्या स्वयंसेवी विद्यार्थ्यांना या महत्त्वपूर्ण मिशनप्रती योगदान देताना पाहून अभिमान वाटतो, ज्यामुळे भावी लीडर्स आणि आपल्या समाजाचे सायबर संरक्षक बनण्यास त्यांच्यासाठी पाया रचला जात आहे.’
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रो. (डॉ.) प्रकाश ए. महानवार या मताला दुजोरा देत म्हणाले, ”क्विक हील फाऊंडेशन आणि त्यांच्या प्रशंसनीय ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ मोहिमेचा भाग असण्याचा खरा सन्मान आहे. हे थोर कार्य सायबरसुरक्षेबाबत माहिती देते, तसेच आमच्या स्वयंसेवी विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी आणि कौशल्य विकासाची भावना जागृत करते. या उपक्रमामध्ये सहभाग घेत आमच्या विद्यार्थ्यांना बहुमूल्य माहिती मिळण्यासह कौशल्य संपादित करतील, ज्यामुळे भावी पदांमधील त्यांच्या यशासाठी योगदान मिळेल. क्विक हील फाऊंडेशनची अशा प्रभावी मोहिमांच्या माध्यमातून आपलया देशाच्या भवितव्याला आकार देण्याप्रती कटिबद्धता अत्यंत प्रशंसनीय आहे.”क्विक हील फाऊंडेशन देशाच्या सामाजिक स्वास्थ्याप्रती निरंतर काम करत आहे, तसेच विविध प्रभावी उपक्रम व मोहिमांच्या माध्यमातून समुदाय सहभाग, विविधता व सर्वसमावेशकतेला चालना देत शिक्षण, कौशल्य विकास आणि प्राथमिक आरोग्यसेवा अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांच्या गरजांची पूर्तता करत आहे.
युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी) ४, ५, ८, ९, १० व १७ शी संलग्न राहत या उपक्रमांनी दुर्गम भागांमधील आदिवासी समुदाय, समाजातील वंचित समुदायांपर्यत आपली पोहोच वाढवत अपेक्षांची पूर्तता केली आहे. फाऊंडेशनने देशभरात आरोग्य व शिक्षणामधील आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून ५० लाखांहून अधिक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मोठा टप्पा गाठला आहे.‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमाव्यतिरिक्त क्विक हील फाऊंडेशनने ‘अर्न अँड लर्न’, ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अशा उपक्रमांच्या माध्यमातून कौशल्यामधील पोकळी दूर करत तरूणांच्या सक्षमीकरणाप्रती देखील मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे.
फाऊंडेशनने आरोग्य यान (पूर्णत: वेद्यकीय व्हॅन्ससह सुसज्जस) डोनेशन उपक्रमाच्या माध्यमातून प्रांतांच्या दुर्गम भागांमध्ये आरोग्यसेवा पोहोचण्याप्रती देखील काम केले आहे. क्विक हील फाऊंडेशनद्वारे आयोजित करण्यात येणारे आऊटरिच उपक्रम, जसे लाइफ स्किल एज्युकेशन, शालंगण समुपदेशन केंद्र, आदिवासी विकास प्रकल्प, आरोग्य मानसंपदा इत्यादी देशाच्या तरूणांमध्ये, विशेषत: वंचित प्रांतांमधील व्यक्तींमध्ये वैयक्तिक विकास व स्वास्यिाला चालना देण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहेत.