आरोग्यपुणेमहाराष्ट्रविशेष

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेतृत्वबदलाची घोषणा; नवीन सीईओची नियुक्ती

सीईओ पदी श्री पमेश गुप्ता यांची नियुक्ती

पुणे:  आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने आपल्या सीईओ पदी श्री पमेश गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ पासून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारलेले श्री. पमेश गुप्ता गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मोठमोठ्या टीम्सचे नेतृत्व करत आहेत, पीअँडएल जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत, व्यवसाय धोरणे विकसित करण्यात तसेच परिवर्तन व्यवस्थानावर भर देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत. गेली अनेक वर्षे श्री गुप्ता यांनी आयडिया सेल्युलर लिमिटेड आणि भारती एअरटेल यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ स्तरावर काम केलेले आहे. 

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी आवश्यक सखोल व व्यापक अनुभव आणि नेतृत्व कौशल्ये त्यांच्याकडे पुरेपूर आहेत. श्री पमेश गुप्ता यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर ऑफ इंजिनीयरिंग, युनायटेड किंगडममधील नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमधून मास्टर इन इलेक्ट्रॉनिक्स आणि कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटी मॉन्ट्रियलमधून एमबीए केले आहे. 

गेली ८ वर्षे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सीईओ पद सांभाळणाऱ्या श्रीमती रेखा दुबे यांनी पदत्याग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता श्री गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुण्यातील एक मल्टीस्पेशालिटी मेडिकल सेंटर आहे. सहानुभूतीपूर्ण, दयाळू भावनेने, दर्जेदार आरोग्य सेवा परवडण्याजोग्या किमतींमध्ये उपलब्ध करवून देण्यासाठी हे हॉस्पिटल वचनबद्ध आहे.  अनेक औद्योगिक संस्थांकडून प्रमाणित करण्यात आलेल्या या हॉस्पिटलला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आणि पुरस्कार मिळाले आहेत. वर्षानुवर्षे, वंचितांना सेवा देण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण करताना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने समाजाला सर्वोत्तम दर्जाचे उपचार प्रदान करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!