सोने- चांदीला खऱ्या हिऱ्याची जोड देत आकांक्षा ज्वेलर्स’चा विस्तार
पुणे (कात्रज): दक्षिण पुण्यात ज्वेलरी क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले आकांक्षा ज्वेलर्स ने सोमवार दिनांक १७ जून २०२४ रोजी विसावा (२०वा) वर्धापन दिवस साजरा केला. आकांक्षा ज्वेलर्सच्या संचालिका सौ. अनिता क्षीरसागर व श्री राहुल क्षीरसागर यांना अथक परिश्रम आणि व्यवसाय कौशल्याने गेल्या दोन दशकांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात मोठे यश मिळवले आहे.
सोने, चांदी या सोबतच आता २० व्या वर्धापन दिनानिमित्त हिऱ्यांच्या दालनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून तर दीप प्रज्वलन करून करण्यात आले. आकांक्षा ज्वेलर्सचे भव्य शोरूम व त्यांचे कलेक्शन्स पाहून अभिनेत्री प्राजक्ता देखील दागिन्यांच्या मोहात पडली. सोबतच शॉप च्या संचालिका अनिता क्षीरसागर यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
ग्राहकांना आकांक्षा ज्वेलर्स मध्ये नेहमीच शुद्ध, उत्तम डिझाईन, नक्षी कारागिरीने घडवलेले कॉलिटी दागिने अनुभवायला मिळतात. डायमंड विभागात रिंग, नेकलेस, ब्रासलेट यांच्या सह ग्राहकांना हवे असलेले सर्व दागिने त्यांच्या पसंती नुसार व बजेट प्रमाणे कस्टमाईज देखील करून देली जातात. वर्धापन दिनानिमित्त ग्राहक व मित्रमंडळी क्षीरसागर दांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज पासून २० दिवस ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. सोबतच मजुरीवर २०% सूट देखील ठेवण्यात आली आहे. भिशीच्या माध्यमातून देखील आपण येथील सेवांचा लाभ घेऊ शकता अशी माहिती आकांक्षा जर चे संचालक राहुल क्षीरसागर यांनी दिली.
त्यामुळे आपल्याला हवी असलेली, आपल्या पद्धतीने डिझाईन केलेली सोने, चांदी व डायमंड ज्वेलरी खरेदी करण्यासाठी नक्कीच जांभूळवाडी रोड, शनि नगर, आंबेगाव बुद्रुक येथील आकांक्षा ज्वेलर’ला भेट द्या व ऑफरचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 8983723379 अथवा 9529472954 या नंबर वर संपर्क करा.