देश-विदेशपुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

सौरभ बाळासाहेब आमराळे यांची – पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती

पुणे : आगामी विधानसभा व महानगरपालिका निवडणूका लक्षात घेता कांग्रेस पक्ष युवकांचे संघटन बळकट करण्यावर महाराष्ट्र भर जोर देत आहे. या पार्श्वभूमीवरच पुणे शहरात पुणे शहर युवक काँग्रेस मध्ये हि मोठा बदल करण्यात आला असून पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जवाबदारी सौरभ बाळासाहेब आमराळे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी आज विविध पदासाठी फेरबदल केला असून नवीन नियुक्त्याची यादी जारी केली आहे. यामध्ये सौरभ बाळासाहेब आमराळे यांचे नाव आहे.

श्रीनिवास बी.व्ही. यांनी म्हणाले, “आपल्या संघटनेला मजबूत करण्यात तुमची सहभागीता आवश्यक आहे आणि गतिमान नेतृत्वाची आवश्यकता आहे.”म्हणून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सौरभ अमराळे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेले 15 वर्षे कार्यकर्ता, उपाध्यक्ष ,वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही भरीव कामगिरी केली आहे.

तसेच ते विविध संघटनांचे पदाधिकारी असून सामाजिक कार्यातही सदैव अग्रेसर असतात.विशेषतः संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे पाहून त्यांच्यावर आता पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सौरभ अमराळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच आजवर कार्य केले आहे.पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देवून युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविताना युवा वर्गाचा जास्तीस जास्त सहभाग काँग्रेस पक्षात व्हावा, यासाठी कार्यरत आहे.

आता अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने सोपवली असून टी आणखी कार्यक्षमतेने निश्चितच पार पाडेन अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!