पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

तीन विधानसभा जागांवर बौद्ध समाजाचा दावा

बुद्ध कार्यकर्त्यांच्या बैठकीने राजकीय पक्षांच्या भुया उंचावणार

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पुणे शहरातील बौद्धांची लोकसंख्या लक्षात घेऊन त्यांना किमान तीन विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी असे मत आज बौद्ध कार्यकर्त्यांच्या पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. पर्वती कॅन्टोन्मेंट व वडगावशेरी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये बौद्ध समाजाचे प्राबल्य असून या ठिकाणावरून सातत्याने बौद्ध लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये या तीनही मतदारसंघातून बौद्ध उमेदवार निवडून जाणे शक्य असल्याने येथुन बौद्ध प्रतिनिधींना संधी द्यावी अशी मागणी बैठकीचे आयोजक व रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुका तसेच बौद्धांचे प्रलंबित प्रश्न या विषयांवर पुणे शहरांमध्ये कार्यरत असलेले सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , धार्मिक व राजकीय क्षेत्रातील बौद्ध कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक आज नाना पेठ येथील अहिल्याश्रम येथे रिपब्लिकन पक्षाचे बाळासाहेब जानराव यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मा. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , मा. नगरसेवक राहुल तुपेरे , मा. नगरसेवक प्रदिप गायकवाड , शिक्षण मंडळाचे सदस्य किरण कांबळे , रिपब्लिकनच्या सुवर्णा डंबाळे , कॉंग्रेसचे सुजित यादव , यशवंत नडधम , विठ्ठल गायकवाड , मिलिंद आहिरे , दिपक गायकवाड, बाप्पुसाहेब भोसले , किरण गायकवाड, स्नेहा माने, स्वाती गायकवाड , अर्चना केदारी, शाम गयकवाड, हनुमंत पपुल, संजय कांबळे , रमेश ठोसर , किरण सोनावणे , उमेश कांबळे , प्रतिक भवार , शंभु कांबळे , अभिजित गायकवाड , संतोष सापळे , आदिमान्यवर उपस्थित होते.

सर्वसमावेशक भुमिका घेत सामाजिक चळवळीत निर्णायक भुमिका घेणारा बौध्द कार्यकर्त्यांना जानिवपुर्वक टारगेट केले जात असुन आगामी काळात अशा बाबी टाळण्यासाठी बौध्दांनी संघटीत होवुन एकविचाराने भुमिका घेण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याची भुमिका बैठकीचे अध्यक्ष बाळासाहेब जानराव यांनी मांडली.

सदर बैठकीत बौध्दांची राजकीय कोंडी , सवलतीच्या अनुषंगाने बौद्धांवर केले जाणारे आरोप , विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती , बौद्धांवरील अत्याचार , नोकर भरती , बौद्ध लेण्यांवरील अतिक्रमणे , आरटीई यासह विविध विषयांवर आज चर्चा करण्यात आली.यावेळी बैठकीचे आयोजन सुवर्णा डंबाळे , नागेश भोसले व प्रतिक डंबाळे यांना केले होते. बैठकीत रिपाई , आंबेडकरी संघटना , राष्ट्रवादी कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार, कॉंग्रेस , शिवसेना ( उबाठा ) , भाजपा , आम आदमी पार्टी , आझाद समाज पार्टीसह विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!