औंध रुग्णालय अधिष्ठाता यमपल्ली यांची राजेंद्र छाजछिडक व हृषीकेश गोहर यांनी घेतली भेट
दिपक कागडा यांच्या प्रलंबित नियुक्ति संदर्भात केली सविस्तर चर्चा
Pune: भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र छाजछिडक आणि अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस चे राष्ट्रीय उपाध्यक्ष हृषीकेश गोहर यांनी औंध जिल्हा रूग्णालयाच्या सफाई कर्मचारी यांच्या प्रश्न निवारणासाठी लाड पागे वारसहक्क समिती शिफारस आणि अनुकंपा नियुक्तित प्रलंबित प्रकरणा संदर्भात अधिष्ठाता यमपल्ली साहेबांची भेट घेतली. २०१० साली अविवाहित बंधु सिकंदर सूरजभान कागडा यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू दिपक कागडा यांना वारसा हक्काने नियुक्ति देणे बंधनकारक होते त्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
त्यानंतर आंदोलन स्थळी दिपक कागडा यांची भेट घेतली. प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही त्यामुळे दिपक कागडा कुटुंब आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अति मागास झाले आहेत. गेल्या१३ वर्षापासून दिपक कागडा एकटेच प्रशासनाशी लढा देत आहेत.
ज्या वेळेस या पूर्ण प्रकरणाची माहीती भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह छाजछिडक आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस रजि बहात्तर (७२) बासष्ट (६२) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष हृषीकेश गोहर यांना मिळाली. वेळ न दवडता त्यांनी संयुक्त रित्या उपेक्षित आणि वंचित कागडा कुटुंबास भेट देऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे प्रकर्षाने नमूद केले.