पुणे, : सॅमसंग या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पुणे शहरातील फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर येथे आपल्या नवीन प्रीमियम एक्सपीरिअन्स स्टोअरचे उद्घाटन केले आहे. विक्री आणि ग्राहक सेवेसाठी आसपासच्या ग्राहकांच्या गरजांसाठी हे स्टोअर वन – स्टॉप सोल्यूशन असेल. फिनिक्स मॉल हे एक प्रमुख शॉपिंग डेस्टिनेशन आहे. येथील सॅमसंग स्टोअर ग्राहकांना लक्षवेधक अनुभव देईल. तसेच त्यांची कनेक्टेड डिवाईस इकोसिस्टम – सॅमसंग स्मार्टथिंग्स – यासह आकर्षक अनुभव देईल.
एकूण 2,021 चौरस फूट क्षेत्रफळ पसरलेल्या या स्टोअरला इमर्सिव्ह झोन शोकेस, स्मार्टफोन, लॅपटॉप, ऑडिओ, गेमिंग आणि स्मार्टथिंग्ज प्रदर्शनासाठी विस्तारीत स्वरूपात डिझाइन करण्यात आले आहे. या स्टोअरमध्ये सॅमसंगच्या Gen Z आणि इतर ग्राहकांसाठी डिझाइन केलेल्या ‘Learn @ Samsung’ प्रोग्रामचा एक भाग म्हणून विविध Galaxy कार्यशाळा भरवल्या जाणार आहेत. यामध्ये AI शिक्षणावर आधारीत उत्पादकता, डूडलिंग, फोटोग्राफी, फिटनेस कार्यशाळा आणि स्थानिक संस्कृतीक कार्यक्रमांचा समावेश असेल. या स्टोअरमध्ये 40 हजार आणि त्याहून अधिक किमतीच्या सॅमसंग उत्पादनांच्या खरेदीवर पहिल्या 100 ग्राहकांना भेट वस्तू मिळणार आहेत.
या व्यतिरिक्त ग्राहकांना आघाडीवर असलेल्या बँकांवर 22.5% कॅशबॅक तसेच स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉचवर 10% पर्यंतचे स्टुडेंट बेनिफिट आणि निवडक वस्तूंवर 21 हजार पर्यंत इकोसिस्टम फायदे यांसारखे विशेष फायदे देखील मिळू शकतात.सुमित वालिया (उपाध्यक्ष, D2C व्यवसाय, सॅमसंग इंडिया) म्हणाले, “हे आमचे पुण्यातील दुसरे स्टोअर आहे, जे आमचे किरकोळ टचपॉइंट्स वाढवण्याच्या आणि ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
नवीन स्टोअर ग्राहक सेवेसह उत्कृष्ट उत्पादन अनुभवांसाठी एक उत्तम पर्याय असेल आणि Galaxy AI कार्यशाळांची देखील येथे आयोजित केल्या जाणार आहेत. जया ‘Learn @ Samsung’ प्रोग्रामचा एक भाग आहे”. या स्टोअरमध्ये ग्राहक सॅमसंगच्या डिजिटल कर्ज मिळवू शकतात. तसेच सॅमसंग फायनान्स+ गॅलेक्सी स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्टवॉचसाठी सॅमसंग केअर+ इतर योजना निवडू शकतात.
हे स्टोअर स्मार्टफोनसाठी विक्रीनंतरची सेवा आणि ग्राहकांच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्व गरजांसाठी होम सर्व्हिस कॉल बुक करण्याची सुविधा देखील प्रदान करते.