पुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

श्री गणेश भक्तांसाठी दाहोत्रे आर्ट्स तर्फे खास मखर प्रदर्शन

५०० रु. पासून ३००+ मखरचे प्रकार, २७ वर्षांपासून दाहोत्रे आर्ट्स'ची परंपरा

Pune : काही दिवसावराच आलेल्या गणेश उत्सवासाठी श्री गणेश भक्त आता गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. गणेशाच्या मूर्ती सोबतच आता उत्तम, देखणे मखर देखील बाजारात विक्री साठी आले असून गणेश भक्त खरेदी करताना पाहायला मिळत आहे. माखरचे उत्तम नक्षीदार कारागिरी करणारे पुण्यातील प्रसिद्ध दाहोत्रे आर्ट्स च्या वतीने पर्यावरण पूरक गणपती मखर चे प्रदर्शन व विक्री सिलाई चौक, बाजीराव रोड वरील आचार्य आत्रे सभागृह येथे आयोजित करण्यात आले असून यामध्ये वॉटर फॉल, अष्टविनायक, दशावतार, श्रीराम मंदिर, मोरया आसन, बासुरी आसन, राजमहाल, काच महाल, महादेव, पांडुरंग आदी ३०० पेक्षा जास्त प्रकार अनुभवायला मिळत आहे.

गेल्या २७ वर्षांपासून या क्षेत्रात सेवा देणारे संतोष दाहोत्रे व सचिन दाहोत्रे यांनी त्यांच्या छंदाला आता व्यवसायाचे स्वरूप दिले असता पुणे सोबतच राज्य, देश आणि जगातील अनेक ठिकाणी दाहोत्रे आर्ट्स च्या देखणेदार मखर ची मागणी असते. या व्यवसायात त्यांना सौ. यामिनी दाहोत्रे व राजश्री दाहोत्रे या देखील सहकार्य करत असून येणारी पिढी देखील नवनवीन कल्पना सकरतांना दिसून येते.

दाहोत्रे आर्ट्स हे आपल्या कलाकुसरीने प्रसिध्द आहेतच! या बरोबरच यांचे अनेक वैशिष्ट्ये देखील पाहायला मिळतात. ते म्हणजे सर्व डिझाईन युनिक, सुंदर आणि आकर्षक असले तरीही सर्व बजेट फ्रेंडली देखील आहे. स्वतः मॅन्युफॅक्चरर आणि होलसेल डिस्ट्रीब्यूटर असल्याने अगदी ५०० रुपया पासून ते १५ हजार किमतीचे मखर येथे उपलब्ध आहे. यामध्ये दर्जेदार इको फ्रेंडली मटेरियल, वूडन, पुठ्ठा, MDF, plywood, rubber foam आदी उत्तम साधनांचा वापर केल्यामुळे टिकाऊ देखील आहे.

त्यामुळे त्वरा करा आणि आजच सिलाई चौक, बाजीराव रोड वरील आचार्य अत्रे सभागृहात येत्या ७ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेला प्रदर्षाला भेट देऊन आपल्या लाडक्या बप्पा साठी मखर बुक करा. अधिक माहितीसाठी 928429 3670 अथवा 983467 1591 या नंबर वर संपर्क करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!