जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आणि भारतीय भागिदारांतर्फे ‘टीबी- मुक्त शाळा’ उपक्रम लाँच

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनच्या संचालक नादिया हन्सल म्हणाल्या, ‘जॉन हॉपकिन्समध्ये आम्ही भारतीय सहकाऱ्यांसह एकत्रितपणे काम करण्यासाठी व अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी तसेच भारत आणि जगभरातील आरोग्याची पातळी उंचावण्यासाठी बांधील आहोत.’
पबमॅटिकच्या इंजिनियरिंग विभागाचे सह- संस्थापक आणि अध्यक्ष मुकुल कुमार म्हणाले, ‘पबमॅटिकमध्ये आम्ही कायमच समाजाच्या ऋणांची परतफेड करण्याच्या संधींच्या शोधात असतो. या सहकार्याच्या मदतीने आम्ही भारतातील क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि प्रत्येक मुलाला निरोगी आयुष्य जगण्याची संधी देण्यासाठी उत्सुक आहोत.
एकत्रितपणे आम्ही भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल, क्षयरोगमुक्त भविष्य तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’ जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने भारतात स्थानिक संस्था व सरकारच्या सहकार्याने संशोधन, प्रशिक्षण उपक्रम राबवत विविध ठिकाणी क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी धोरणे अमलात आणली आहेत.
टीबी- मुक्त शाळा उपक्रमामुळे भारत व जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्यातील शतकभर जुने नाते व शिक्षण, वैद्यकीय तसेच अभियांत्रिक संशोधन क्षेत्रातील काम आणखी बळकट झाले आहे.