सर्व दोषींना शिक्षा मिळे पर्यंत हा लढा सुरु ठेवला जाईल : राहुल डंबाळे
ऑनर किलिंग च्या घटनांमध्ये फाशीची व मोका अंतर्गत तपासाची तरतूद करा : डॉ. सिद्धार्थ धेंडे

भोर : ” विक्रम गायकवाड हत्यांकाडाच्या अनुषांगाने ग्रामीण भागातील दलित जनता एकटी नसून त्यांच्यासोबत शहर व राज्यातील आंबेडकरी समाज बांधव आहेत, हा विश्वास देण्यासाठी आजचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाची गंभीर दखल न घेतल्यास आगामी काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल व ते राज्यव्यापी राहील.” अशी असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी आज भोर येथे दिला.
बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांच्या निर्घुन हत्याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात यावी व हा गुन्हा ऑनर किलिंग अंतर्गत तपासला जावा या प्रमुख मागणीसाठी आज भोर येथील स्थानिक व पुण्यातील विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भोर तहसील कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

भोर येथील धम्मभूमी येथून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आल. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक बिराजदार पोलीस, उपअधीक्षक व माननीय तहसीलदार यांनी कुटुंबीयांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारले.
विक्रम गायकवाड हत्याकांड तपास दडपने हे निंदावजनक आहे तसेच ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व गुन्ह्याचा संपूर्ण तपास हा मोक्का कायद्यान्वये करण्याबाबतची भूमिका घ्यावी अशी मागणी डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी मूक मोर्चा आंदोलनात व्यक्त केली.

दरम्यान ” ऑनरकिलिंग च्या घटना राज्यभर वाढत असताना त्याअनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असताना सरकार हेतूता दुर्लक्ष करत आहे. तसेच प्रत्येक वेळी दलित व बौध्दांच्या हत्याकांडांवेळी न्यायासाठी आंबेडकरी समुदायाला आंदोलनच करावी लागतात हा कायद्याचा मोठा पराभव आहे हे आपण मान्य करायला हवे, तसेच या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करुन त्यांना शिक्षा मिळे पर्यंत हा लढा सुरु ठेवला जाईल अशी भुमिका रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली.
मोर्चेकरांच्या व कुटुंबीयांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन त्या दृष्टीने तपास करण्यात येईल अशी भूमिका मोर्चेकर्यांसमोर अप्पर पोलीस अधीक्षक बिराजदार यांनी निवेदन स्विकाल्या नंतर मांडली.आजच्या मोर्चात माजी आमदार जयदेव गायकवाड , जेष्ठ नेते वसंत साळवे , वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अरविंद तायडे , समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जांबवंत मनोहर , नागेश भेसले आदी मान्यवर उपस्थित होते.

धम्मभुमी भोर येथुव सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पूर्णतः मूक स्वरूपामध्ये घेण्यात आला यावेळी कोणतीही घोषणाबाजी व भाषण बाजी न करता केवळ कुटुंबीयातील फिर्यादी विठ्ठल गायकवाड यांनी कुटुंबाच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करून समाजाकडे न्यायाच्या अपेक्षेची मागणी केली. यावेळी प्रास्ताविक प्रविण ओव्हाळ यांनी तर सुत्र संचलन रोहीदास जाधव यांनी केले.
मोर्चामध्ये उपस्थित पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई व विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस तपासाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली असून या तात्काळ सुधारणा न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन पुणे व मुंबई येथे घेण्यात येईल असा इशारा दिला. सदर मोर्चाचे आयोजन भोर येथिल आंबेडकरी चळवळीतील प्रविण ओव्हाळ , रोगिदास जाधव , बाळासाहेब अडसुळ , नवनाथ गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.