
Pune: २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन हा प्रसिद्ध मराठी कवी, लेखक कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.त्याचेच औचित्य साधत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी रिल्सस्टार अथर्व सुदामे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी कुसुमाग्रजांच्या “जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी ! गेल्यावर ही या गगनातील, गीतांमधुनी राहीन मी” या कवितेचा उल्लेख करीत कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पुढे ते बोलताना म्हणाले, २००० वर्षापूर्वीची आपली मराठी भाषा संत ज्ञानेश्वर यांनी संस्कृत मधील असलेली ज्ञानेश्वरीचे मराठीत अनुवाद केले. त्यामुळे मराठी जपण्याचे काम करत संतांनी, कलाकर, लेखक,कवी यांनी जे योगदान दिले आहे, त्याची जाणीव आपल्याला असणे गरजेचे आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल केंद्र शासन व राज्य शासनाचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी स्वागत करत अभिनंदन केले.

सदर उपक्रमाचे विरोधी पक्षनेते,उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे, युवती शहध्यक्ष कु.पूजा झोळे, कार्याध्यक्ष कु.लावण्या शिंदे यांनी आयोजन केले होते.सदर प्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, मा.नगरसेवक,बाळासाहेब बोडके, खडकवासला विधानसभा अध्यक्ष प्रदीप धुमाळ, शिवाजीनगर अध्यक्ष अभिषेक बोके, कसबा अध्यक्ष अजय दराडे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष महेश हांडे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे,अल्पसंख्याक महिला अध्यक्ष नूरजहा शेख,वकील अध्यक्ष विवेक भरगुडे, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे, ग्राहक संरक्षण अध्यक्ष राजेंद्र घोलप, कोथरूड महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, सरचिटणीस दुष्यंत जाधव, धनंजय पायगुडे, अनिकेत कोठवदे, उपाध्यक्ष शिवाजी पाडाळे, डिंपल इंगळे, प्रशांत निम्हण, योगेश वराडे, वंदना साळवी, विवेक मुगळे, सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव, अंगद माने, युवक कार्याध्यक्ष आनंद सागरे, युवती कार्याध्यक्ष श्रेया तांबे, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर,
शिवाजीनगर कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, राहुल तांबे, शिवाजीनगर विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, कोथरूड युवक अध्यक्ष मोहित बराटे, कोथरूड विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत मोकर, कसबा युवक अध्यक्ष गजानन लोंढे, शिवानी पोतदार, सागर चंदनशिवे, अर्चना वाघमारे,ओंकार निम्हण, शैलेश मानकर, अलीम शेख, सचिन जाधव,अरुण गवळे, नवनाथ खिलारे, प्राजक्ता देसले,सुरेखा पाटील,राणी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.