२ मार्च २०२५ रोजी पुण्यात योद्धा स्कॉलर- वॉरियर कॉन्क्लेव्हचे आयोजन

पुणे: संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी पुण्यातील मारुंजी येथील नामांकित योद्धा डिफेन्स इन्स्टिटयूट च्या योद्धा स्कॉलर- वॉरियर कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कॉन्क्लेव्ह हा रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० ते २:०० ह्या वेळेत एस.पी. कॉलेजमधील लेडी रामाबाई हॉल येथे संपन्न होईल. ह्या कार्यक्रमामध्ये प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले, कोकण विभागचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (IAS), लेफ्टनंट जनरल आर.आर. निभोरकर ( सर्जिकल स्ट्राइक चे शिल्पकार) आणि लेफ्टनंट जनरल एस.पी. गोस्वामी ( निवृत्त)हे मुख्य वक्ते म्हणून असणार आहेत. मुख्य वक्ते आपले अनुभव व भविष्यातील संधी ह्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
हा कार्यक्रमात नवीन योद्धा पॅटर्न चा शुभारंभ होणार असून हा नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम एक नवीन दृष्टिकोन केंद्रित करेल. ह्या कार्यक्रमात योद्धा डिफेन्स इन्स्टिटयूटच्या आगामी कॅंप्सविषयी माहिती देण्यात येईल. तसेच संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी कशी करावी तसेच विविध संधी ह्याविषयी मार्गदर्शन देण्यात येईल.
जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी ह्या संधीचा फायदा घेऊन ह्या कॉन्क्लेव्हला उपस्थित राहावे असे आवाहन योद्धा इन्स्टिटयूटचे संस्थापक लेफ्टनंट कर्नल रणजीत सिंग नलावडे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.