पुणेराजकीयविशेष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गटात) शंभर युवक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

Pune: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गटात) सुमारे 100 युवक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष कनव चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गटाचे) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष सिद्धांत नारायण सारवान आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा कार्याध्यक्ष स्वप्निल कदम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्यालयामध्ये पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या उपस्थितीत सुमारे 100 युवक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.

सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा युवक अध्यक्ष सिद्धांत सारवान यांनी सांगितले युवा कार्यकर्त्यांची पुणे शहरात पक्षाच्या माध्यमातून ताकत वाढवणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार त्यांना मार्गदर्शन करणार, युवा कार्यकर्त्यांची सभासद नोंदणी अभियान सुरू करणार असे यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गटाचे) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर धावडे, आदर्श पवार, विनायक लोणारे, रवींद्र कळमकर शुभम सारवान ऋषिकेश पवार, राजकुमार बाळसराफ आदि यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!