सैनिक सेलच्या ॲड. मेघा कुलकर्णी यांचे जवानांसोबत रक्षाबंधन
पुणे: भारतीय सैन्यातील सैनिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट सैनिक सेलच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधनचा पवित्र सण साजरा करण्यात आला. भावाप्रमाणेच देशाची व देशवासीयांचे रक्षण करणारा प्रत्येक सैनिक हा आपल्यासाठी जीवाचे प्राण अर्पण करून सेवा करत असतात. अश्या सैनिक बांधवांना राखी बांधण्याचे काम सैनिक सेलच्या ॲड. मेघा कुलकर्णी घ्या दरवर्षी करत असतात यंदा देखील त्यांनी द क्यून मारीज् टेक्निकल इन्स्टिट्यूट खडकी येथील इन्स्टिट्यूट फॉर डिफरनेटली एबल सोल्जर्स सैनिकांना राखी बांधून बहीण भावाचे नाते घट्ट केले. यावेळी त्यांनी व निवृत्त लेफ्ट. कर्नल समीर कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व सैनिकांसोबत संवाद साधला.
ॲड. मेघा समीर कुलकर्णी ह्या सैनिक परिवारासाठी वर्षभर विविध कामे करत असतात. यामधे वीर माता, वीर पत्नी यांना आधार देण्यासाठी महत्त्वाचा वाटा त्यांचा आहे. सोबतच सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच त्याच्या परिवारातील प्रत्येक घटकासाठी काम करण्याची भावना त्यांची असते. आज देखील हे पारेवारिक नाते मजबूत व्हावे या उद्देशाने आज सैनिक भावांचे औक्षण करून, राखी बांधून तर मिठाई देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करताना त्यांचे मन भरून आले होते.
सैनिकांप्रती कुलकर्णी परिवाराचा स्नेह पाहून सी.इ.ओ. कर्नल राहुल बाली, डीन कर्नल डॉ. वसंत बल्लेवार व उपस्थित इतर सैनिकांनी कौतुक केले व स्नेहाबद्दल आभार मानले. तसेच येणाऱ्या काळात विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी देखील ॲड. मेघा कुलकर्णी व कर्नल समीर कुलकर्णी यांना आमंत्रित केले. मोकळ्या मनगटावर राखी बांधून बहिणीची उणीव आपण पूर्ण केली अशा भावना देखील याप्रसंगी सैनिकांनी व्यक्त केल्या.
यावेळी ॲड. यज्ञेश्वरी समीर कुलकर्णी, राजवंत सिंग, विनोद शिंदे, बाबासाहेब जाधव, अलका भोसले, सुखदेव भोसले, नंदा जाधव, वैभवी पाटील, प्रणिता मोरे, प्रज्वल भालेराव, आदित्य शिवरकर, अजित आदी उपस्थित होते.