महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
पुणे कॅंटॉन्मेंट मधील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न
पुणे : , सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी येथे आणि हरियाणामध्ये लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीए सरकारला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत हरियाणामध्ये एनडीए सरकारला लोकांनी पसंती दर्शवली आहे. अन् तोच इतिहास महाराष्ट्रातही घडेल, महायुतीची सत्ता येईल असा मला विश्वास आहे.
देशात आजवर जास्त काळ काँग्रेसच सरकार होत. तरी देखील त्यांना गरीबी आणि बेरोजगारी कमी करता आलेली नाही अशी टीका देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. भाजपा महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ गोळीबार मैदान येथे आयोजित जाहिर सभेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे, माजी मांत्री दिलीप कांबळे, राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष धिरज घाटे आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, श्रीनाथ भिमाले, अर्चना पाटील, सुशांत निगडे, महेश पुंडे, विवेक यादव , प्रियंका श्रीगिरी यांच्यासह महायुती मधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, आधुनिक भारताच्या विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आहे ते कोणी नाकारू शकत नाही मात्र सध्या काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानाबद्दल खोटे नॅरेटिव्ह पसरवले जात आहे वास्तविक ज्या बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्र जन्मभूमी, कर्मभूमी आहे त्या महाराष्ट्रात काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांना योजनाबद्ध रित्या निवडणुकीत हरवले होते. आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही. नाही काँग्रेसच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळायला हवं होतं मात्र ते काँग्रेसने दिला नाही.
ते म्हणाले राजकारण हे केवळ सरकार बनवण्यासाठी नाही तर विकासासाठी आणि देश बनवण्यासाठी केला गेला पाहिजे. आम्ही महिला केंद्री विकासाची संकल्पना नेहमी मांडली आहे, लाडकी बहीण, उजवला योजना या त्यांचाच भाग आहेत. आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला आहे. या उलट कॉँग्रेसने महिला सक्षमीकारणाचा विचार केला नाही. भाजपने आता संसदेतही महिलांना समान संधी दिली आहे. भाजपने कधी संविधानाचा अवमान केला नाही, कॉँग्रेसने संविधानाच्या प्रस्ताविकेत बदल करून देशाची फसवणूक केली आहे. आता जाती जनगणनेच्या माध्यमातून देशाला जाती जाती मध्ये वाटण्याचे पाप कॉँग्रेस करत आहे. हि जनगणनं करण्यापूर्वी कॉँग्रेस कोणत्या जातीला किती आरक्षण देणार हे त्यांनी जाहीर कारावे असे आवाहन त्यांनी केले.
कलम 370 हटवून आम्ही देश एकसंघ केला, तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्यामुळे मागील दहा वर्षात भारताचे जगात राजकीय वजन वाढल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. दिलीप कांबळे म्हणाले, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा गेली 10 वर्ष विकास करत असताना अनेक प्रश्न आम्ही पुणे महानगर पालिका आणि माहायुतीच्या सरकारच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावले आहेत. मग तो घोरपडीचा उड्डाण पूल असेल, येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल. आज भारताला पुढे घेवून जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी येत्या मतदानावेळी कमळ समोरच बटण दाबून विकासाला मतदान करा.
सुनील कांबळे म्हणाले, महायुती सरकारने आजवर केलेले काम आणि विकासाचा मुद्दा घेवून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. तेव्हा येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपलं मत गुन्हेगारांना पोसणाऱ्या उमेदवाराला द्यायचे का? माझ्यासारख्या काम करणाऱ्या लोकप्रतीनिधीला द्यायचे? याचा मतदारांनी विचार करावा, असे आवाहन केले.आभार कॅंटॉन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री यांनी मानले.
*चौकट * सुनील कांबळे यांना उज्वल भविष्य – राजनाथ सिंह *संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करत पुणेकरांना साद घातली. महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना मी पहिल्यांदा भेटत असलो तरी त्यांनी त्यांच्या थोडक्यात केलेल्या भाषणात महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. सुनील कांबळे हे अतिशय उत्तम व्यक्ती असून त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल असल्याचे सांगितले.